तंत्रज्ञान हे मानवतेच्या प्रगतीसाठी फायदेशीर -डॉ. अजय उल्हे


पीसीयू मध्ये आयईईई ची शाखा स्थापन



पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – तंत्रज्ञान हे मानवतेच्या फायद्यासाठी तसेच प्रगतीसाठी खूप फायदेशीर आहे. पीसीयू मध्ये आयईईईची शाखा स्थापन केल्यामुळे याचा विद्यार्थ्यांना व्यावसायिक ज्ञान मिळवण्यासाठी आणि त्यांचा गुणवत्ता पूर्वक व्यावसायिक विकास त्यासाठी उपयोग होईल. या नेटवर्किंग मधून अनेक नवनवीन संधी प्राप्त होतील प्राप्त होतील असा विश्वास पिटीसी सॉफ्टवेअरचे संचालक डॉ. अजय उल्हे यांनी व्यक्त केला.

पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट अंतर्गत साते, वडगाव मावळ येथील पिंपरी चिंचवड विद्यापीठात इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स आणि इंजिनियर्स संस्थेच्या विद्यार्थी शाखेची स्थापना डॉ. अजय उल्हे यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी पीसीयू कुलगुरू डॉ. मणीमाला पुरी, उपकुलगुरू डॉ. सुदीप थेपडे, आयईईई शाखेचे समन्वयक प्रा. डॉ. स्वाती शिर्के – देशमुख आदी उपस्थित होते.
पीसीसीओईचे उपसंचालक डॉ. एन. बी. चोपडे यांनी व्यवस्थापन तसेच विद्यार्थ्यांच्या नेतृत्वाखाली उपक्रमांच्या भूमिका आणि आयईईई चे सदस्यत्व मिळण्याचे फायदे याबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
उपकलगुरू डॉ. सुदीप थेपडे यांनी विद्यापीठाच्या तांत्रिक शिक्षणाच्या उत्कृष्टते बाबत प्रगत दृष्टिकोन सांगितला.
शाखेचे समन्वयक डॉ. स्वाती शिर्के-देशमुख म्हणाल्या की, पीसीयु मधील ही विद्यार्थी शाखा तांत्रिक आणि सॉफ्ट स्कीलच्या विकासाला प्रोत्साहन देण्यास मदत करणारी असेल. उद्योगाशी संबंधित प्रकल्पांमध्ये सहभागी होऊन विस्तृत अभियांत्रिकी क्षेत्रात वेगवेगळे अनुभव मिळवून देईल. यामुळे विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळेल.
नव नियुक्त सदस्यांना शपथविधी आणि प्रमाणपत्र वितरण करण्यात आले. एकूण २९ सदस्यांची निवड करण्यात आली.
अरफिया शिकलगर – अध्यक्ष, आदित्य जाधव – उपाध्यक्ष, सुरज राक्षे आणि जय पाटील – सचिव, श्रवण राऊत व मयूर खर – खजिनदार यांची नियुक्ती करण्यात आली. तसेच अमन शेख – तांत्रिक टीमचे प्रमुख, हिरण पटेल – उपप्रमुख, ध्रुव चौधरी – सदस्य, प्रचार टीमचे प्रमुख – अनुष्का पाटील, उपप्रमुख – रेनी शर्मा, इव्हेंट व्यवस्थापन टीमचे प्रमुख – आदित्य रासल, उपप्रमुख – हर्ष चव्हाण, डिझाईन टीमचे प्रमुख – विराज आवटे, उपप्रमुख – अलिशा काळोखे, प्रायोजक आणि वित्तपुरवठा टीमचे प्रमुख – मृण्मयी देसाई, उपप्रमुख – साहिल साबळे व प्रज्वल शिरुड, वृत्तपत्र आणि सामग्री विभागाचे प्रमुख – अनिका इनामदार व सैराज साळुंखे, उपप्रमुख – विश्वम घोरपडे, लोक व्यवस्थापन टीम प्रमुख – सुरज मदाने, उपप्रमुख – जय गोडसे, तांत्रिक कार्यशाळा आयोजक टीम प्रमुख – स्वरणगी कोठावडे, सदस्य भुमिका गुर्जर, शुन्हम गायकवाड, स्वयंसेवी समन्वयक – अभिजीत चव्हाण, राजकुवंर मोहिते आणि श्रेयस बागराव यांचीही नियुक्ती करण्यात आली.
पीसीयुच्या नवनिर्वाचित विद्यार्थी शाखेला पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्मा भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त तथा पीसीयूचे कुलपती हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, व्यवस्थापकीय संचालक डॉ. गिरीश देसाई, कुलगुरू डॉ. मनीमाला पुरी, उपकुलगुरू डॉ. सुदीप थेपडे यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.








