ताज्या घडामोडीपिंपरीपुणे

स्वराज्य संग्रामच्यावतीने शिवजयंतीनिमित्ताने शिवनेरी किल्ला स्वच्छता मोहिमेचे आयोजन

Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – स्वराज्य संग्रामच्या वतीने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी शिवनेरी किल्ला स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. स्वच्छता मोहिमेचे हे नवे वर्ष होते दरवर्षी 19 फेब्रुवारी शिवजयंतीच्या दुसऱ्या दिवशी 20 फेब्रुवारीला किल्ला स्वच्छता मोहिमेचे आयोजन केले जाते.

यात शिवप्रेमी मोठ्या प्रमाणात सहभागी होतात सकाळी लवकर सुरू झालेली ही मोहीम दुपारपर्यंत किल्ला स्वच्छ करून सर्व कचरा घेऊन शिवप्रेमी खाली उतरतात.

अलीकडे “छत्रपती शिवाजी महाराज व अन्य महापुरुषांच्या बद्दल काहीजण अवास्तव वक्तव्य करून समाजात अशांतता पसरवण्याचे काम करत आहेत त्यांना आवरण्यासाठी सर्व आमदार खासदारांनी संसदेत आवाज उठवून त्यावर कायदा अमलात आणावा अशी मागणी यावेळी महेश लाड यांनी केली.”

या मोहिमेत स्वराज्य संग्रामचे रमेश खंडागळे, संदीप कोकाटे, योगेश मोटे, मोहन पाटील, राहुल पाटील, अक्षयकुमार झावरे, मस्कु हजारे, हर्षवर्धन खंडागळे, श्रेयस हजारे, आरुष कोकाटे आदीसह पदाधिकारी सामील झाले होते.

स्वराज्यातले गडकिल्ले हा आपला ऐतिहासिक वारसा आहे आणि तो जतन करणे हे एकट्या सरकारची जबाबदारी नसून संपूर्ण समाजाची जबाबदारी आहे.

गोळा केलेला सर्व कचरा नगरपरिषदेच्या कचरा संकलन विभागाकडे सुपूर्द करण्यात आला तसेच यावेळी सहलीसाठी आलेल्या मुलांना रमेश खंडागळे व महेश लाड यांनी शिवराय समजून घेताना काय करावे याबद्दल मार्गदर्शन केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button