निगडीतील खंडोबा मंदिरात चंपाषष्ठी उत्साहात साजरी
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – निगडीतील खंडोबा मंदिरात श्री खंडोबा प्रतिष्ठानच्या मार्तंड भैरव षडरोत्सवानिमित्त (देव दीपावली) विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवाची सांगता सोमवारी चंपाषष्ठीच्या कार्यक्रमाने हजारो भाविक भक्तांच्या उपस्थितीत झाली.
षडरोत्सवानिमित्त दररोज पहाटे काकड आरती, भजन कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते. सोमवारी चंपाषष्ठी निमित्त पहाटे श्री खंडोबा आणि महादेवाच्या पिंडीला महाअभिषेक करण्यात आला, दुपारी विठ्ठल रूक्मिणी महिला भजनी मंडळ दापोडी यांचा भजनाचा कार्यक्रम, त्यानंतर जागरण गोंधळ तर सायंकाळी महाआरती करण्यात आली. आलेल्या सर्व भाविक भक्तांना महाप्रसाद वाटप करण्यात आले. सकाळ पासून पंचकृषितील भाविक भक्तांनी मंदिरात येऊन खंडेरायाचे व आयोध्या येथून आलेल्या श्रीराम पूजा मंगल अक्षता व कलशाचे ही दर्शन घेतले अशी माहिती अध्यक्ष तानाजी काळभोर यांनी दिली.
या कार्यक्रमाचे नियोजन देवस्थानचे अध्यक्ष तानाजी काळभोर, उपाध्यक्ष सोमनाथ काळभोर, खजिनदार जंगली महाराज काळभोर, कार्याध्यक्ष शंकरआप्पा काळभोर, सचिव भाऊसाहेब काळभोर, विश्वस्त दीपक काळभोर, ॲड. राजेंद्र काळभोर, दिलीप काळभोर, राजेंद्र ल.काळभोर, चेतन काळभोर, राजू अ. काळभोर यांनी केले. पोलिस अधिकारी रणजित सावंत, तेजस्विनी कदम, राजेंद्र बहिरट, राजेंद्र बोरसे तसेच देहु देवस्थानचे विश्वस्त सुनिल महाराज मोरे, राजेंद्र महाराज मोरे, अमोल महाराज मोरे, उद्योजक जयदीप खापरे, रोहीदास गाडे, निखिल दरेकर, विजय तारक, माजी नगरसेविका सुमन पवळे, शर्मिला बाबर, कमल घोलप, अश्विनी बोबडे, माजी नगरसेवक शांताराम भालेकर, पंकज भालेकर, हिरामण येळवंडे आदी उपस्थित होते. महाप्रसादाचे नियोजन भानुदास काळभोर, शंकर पा. काळभोर, दत्तात्रय पा. काळभोर, संभाजी काळभोर, अजय काळभोर, सुशांत मोहिते, विशाल मडके, इंद्रसिंग राजपूत, बबन जीवना, वैभव कुऱ्हाडे, विश्वास थोरात, सतिश झेंडे, योगेश काळभोर, अमोल काळभोर, हनुमंत रेवी, स्वाती इंजे, संस्कृती सुधीर ढगे, मार्तंड रेवी, प्रेमा रेवी, संदिप केंदळे यांनी केले.