ताज्या घडामोडीपिंपरीभोसरी

विश्वकर्मा जयंती महोत्सव उत्साहात साजरी

Spread the love

आळंदी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – श्री विश्वकर्मा जयंती निमित्त चिंबळी (बर्गेवस्ती) येथे अखिल महाराष्ट्र विश्वकर्मा सुतार समाज महासंघा तर्फे विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यातआले असल्याचे कोषाध्यक्ष गुलाब खंडागळे यांनी सांगितले.

श्री विश्वकर्मा जयंती निमित्त सकाळी अभिषेक व महापुजा करण्यात आली. हभप संतोष महाराज ताजणे यांचे प्रवचनरुपी सेवा रुजू झाली. त्यानंतर आलेल्या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. दुपारी रूपीनगर ‌येथील विठ्ठल रूक्मिणी सांप्रदायिक महिलांचे संगीत भजनांचा कार्यक्रम आयोजित करून महाप्रसाद वाटप झाले यावेळी अध्यक्ष चंद्रकांत कदम, उपाध्यक्ष कालीदास खंडागळे, सरचिटणीस संजय गायकवाड, संघटक शिवाजी भालेकर, अमर गायकवाड, राजेंद्र खंडागळे, उपसरपंच राहुल चव्हाण, सामाजिक कार्यकर्ते हनुमंत खंडागळे आदी मान्यवर उपस्थित होते. सूत्रसंचालन संघटक दत्तात्रय गुंजाळ यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button