“रावबहादुर नारायण मेघाजी लोखंडे हे कामगार युग प्रवर्तक – डॉ.भारती चव्हाण


पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) “पारतंत्र्यात संघटन कार्य करणे कठीण असतानाही कामगार संघटना चळवळीचे जनक नारायण मेघाजी लोखंडे यांनी कामगारांसाठी अतिशय मोलाचे कार्य केले आहे. कामगारासाठी साप्ताहिक सुट्टी,जेवणासाठी दुपारची सुट्टी,मिलचे काम रात्री बंद ठेवणे,पगार नियोजित तारखेपर्यंत देणे आदी सुविधा मिळवून दिल्या.हे कार्य अतिशय मोलाचे असुन कामगार युग प्रवर्तनाचे आहे.”



गुणवंत कामगार कल्याण मंडळ महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने कामगार नेते रावबहादूर नारायण मेघाजी लोखंडे यांच्या स्मृती दिनाच्या निमित्ताने कन्हेरसर, ता.राजगुरुनगर येथील त्यांच्या निवासस्थानी जाऊन लोखंडे यांच्या स्मृतीस उजाळा देण्यात आल्या.त्यावेळी गुणवंत कामगार कल्याण मंडळाच्या अध्यक्षा डॉ.भारती चव्हाण बोलत होत्या.
कन्हेरसर ग्रामपंचायतच्या रावबहादूर नारायण मेघाजी लोखंडे सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाला कन्हेरसरच्या सरपंच सुनीता केदारी,पोलीस पाटील विठ्ठल पवार,ना.मे. लोखंडे यांचे नातू बाबाजी लोखंडे,दत्तात्रय दगडे,रवी बलांडे,राहुल मसुडगे,रमेश ताम्हाणे,कामगार कल्याण मंडळ चाकण येथील अधिकारी अविनाश राऊत,बाबाजी दौंडकर
गुणवंत कामगार कल्याण मंडळाच्या संस्थापक अध्यक्षा डॉ.भारती चव्हाण , उपाध्यक्ष तानाजी एकोंडे , सचिव राजेश हजारे, सहसचिव संजय गोळे, ,खजिनदार भरत शिंदे, पिँ.चिं.शहराध्यक्ष महंमदशरीफ मुलाणी,शहर खजिनदार बाळासाहेब साळुंके कामगार भुषण राजेंद्र वाघ ,गुणवंत कामगार रामदास सैंदाणे,शंकर नाणेकर,बळीराम शेवते, रघुनाथ फेगडे,सोमनाथ वाले,नवनाथ नलावडे इ.उपस्थित होते.
डॉ.डी.वाय.पाटील महाविद्यालयाचा अक्षय निकम यांच्यासह त्यांचा निवासी अभ्यास गट आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
डॉ.भारती चव्हाण पुढे म्हणाल्या,”नवीन पिढीने नारायण मेघाजी लोखंडे यांच्या कार्यापासून प्रेरणा घ्यायला हवी,तरुण युवक आणि महिलांनी समाजाचे नेतृत्व करण्यासाठी पुढे येणे गरजेचे आहे.”

कन्हेरसर येथील लोखंडे यांच्या स्मारकासाठी गुणवंत कामगार कल्याण मंडळातर्फे पूर्ण सहकार्य केले जाईल. अशी भावनाही त्यांनी यावेळी बोलून दाखविली.
आपला परिवार समूहाचे कार्यकर्ते नवनाथ नलावडे यांनी “शासन आणि भांडवलदार यांच्या धोरणामुळे कामगार संघटना आणि कामगार वर्ग नेस्तनाबूत होत आहे,त्यासाठी कामगार चळवळ अधिक नेटाने चालविणे गरजेचे आहे.”असे नमूद केले.
कामगार भूषण राजेंद्र वाघ,जेष्ट साहित्यिक तानाजी एकोंडे,गुणवंत कामगार कल्याण मंडळाचे सचिव राजेश हजारे,कामगार कल्याण अधिकारी अविनाश राऊत यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.
गुणवंत कामगार कल्याण मंडळाचे पिंपरी-चिंचवड शाखेचे अध्यक्ष महंमदशरीफ मुलाणी,कोषाध्यक्ष बाळासाहेब साळुंके आणि स्थानिक कार्यकर्त्यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले.महंमदशरीफ मुलाणी यांनी सूत्रसंचालन आणि लक्ष्मण ताम्हाणे यांनी आभार मानले.








