पिंपरी चिंचवड महानगरपालिका कर्मचारी महासंघाची शनिवारची सर्वसाधारण सभा रद्द – मा.औद्योगिक न्यायालयाचे आदेश


शशिकांत झिंजुर्डे गटला मोठा धक्का, तर कर्मचारी वर्गामध्ये आनंद



पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड महानगरपालिका कर्मचारी महासंघाची दि.22/02/2025 वार शनिवार रोजीची वार्षिक सर्वसाधारण सभा मा.औद्योगिक न्यायालयनाने रद्द केली असल्याचे आपला महासंघाचे बाळासाहेब कापसे यांनी सांगितले. यामुळे या सर्वसाधारण सभेत मतपेटीव्दारे मतदान न घेता पुढील महासंघाची कार्यकारणी मोजक्या कर्मचारी वर्गातून निवडली जाणार होती. ती आता रद्द झाल्यामुळे कर्मचारी वर्गानी सुटकेचा श्वास सोडला आहे.
7 फेब्रुवारी रोजी कर्मचारी महासंघाच्या विद्यमान कार्यकारणीकडून दि. 22 फेब्रुवारी 2025 रोजी महासंघाची वार्षिक सर्वसाधारण सभा आयोजित केली होती. या सभे मध्ये कलम 11 नुसार पुढील तीन वर्षाची महासंघाच्या पदाधिकारी व कार्यकारणी सदस्यांची निवड केली जाणार होती. पण ही निवड मा.अप्पर कामागार आयुक्त यांच्या आदेशानुसार व मतदान पेटीव्दारे न घेता सभेला जे सभासद उपस्थित आहेत त्यांच्यातून मते आजमावून घेतली जाणार होती असे कापसे यांनी सांगितले. त्यामुळे कामगार वर्गामध्ये प्रचंड संताप व्यक्त होत होता. या या सर्वसाधारण सभेबाबत बाळासाहेब कापसे यांनी औद्योगिक न्यायालयात धाव घेऊन या आदेशा विरुध्द दाद मागितल्या नंतर न्यायालयाने हा निर्णय दिला आहे.

हा युक्तिवादा आला कामीः-
कर्मचारी महासंघाच्या मागील 25/02/2025 रोजी झालेल्या कर्मचारी महासंघाच्या निवडणूकी मध्ये निवडून आलेल्या अध्यक्ष व कार्यकारणी पदाच्या निवडी बाबत मा. औद्योगिक न्यायालय पुणे, येथे आय.सी.टी यु.अर्ज क्र.7/2022 दाखल असून अद्यापही प्रलंबित आहे. सदरची निवडणूक ही बेकायदा व चुकीची होती व आहे या बाबत मा.औद्योगिक न्यायालयात विवाद उपस्थितीत करण्यात आलेला असून तो आजही प्रलंबित आहे. म्हणून अर्जदार यांनी दि.27/08/2024 रोजी उपनिंबधक श्रमिक संघ शिवाजीनगर, पुणे यांचेकडे रितसर श्रमिक संघ अधिनियम 1926 चे नियम 23(1) नुसार रितसर फार्म के मध्ये अर्ज दाखल केला होता. तरीही विद्यमान कार्यकारणीने घटनाबाह्य व अधिकाराचा दुरपयोग करुन कामकाज चालुच ठेवले होते. या बरोबच अनेक पदाधिकारी वर्गाच्या सेवा समाप्ती, पदोन्नोती अशा अनेक विषयाकडे देखील मा.न्यायालयाचे लक्ष धल्याने व हा युक्तिवाद ग्राहय धरुन मा.न्यायालयाने हा निर्णय दिला असल्याचे बाळासाहेब कापसे यांचे वकील अँड. संतोष म्हस्के यांनी सांगितले. तर बाळासाहेब कापसे यांनी मा. न्यायायलय, महापालिकेतील कर्मचारी वर्गाचे व अँड. म्हस्के यांचे देखील आभार मानले आहेत. तर सत्ताधारी गटाने आम्ही देखील न्यायालयीन पध्दतीने ही लढाई लढून न्याय मिळवू असे सांगितले.








