पिंपरी चिंचवड हाफ मॅरेथॉन २०२३ स्पर्धेत स्पर्धकांचा उत्साह
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपळे सौदागर येथील कै.बाळासाहेब कुंजीर क्रीडांगण याठिकाणी यशदा रियालिटी ग्रुप एमडी वसंत काटे , नगरसेवक शत्रुघ्न काटे युथ फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने “पिंपरी चिंचवड हाफ मॅरेथॉन २०२३” ही स्पर्धा यशस्वीपणे रविवारी दि.17 डिसेंबरला पार पडली.सलग तिसऱ्या वर्षी “पिंपरी चिंचवड हाल्फ मॅरेथॉन” मध्ये स्पर्धकांचा उत्साह पहायला मिळत आहे.
कै.बाळासाहेब कुंजीर क्रीडांगण पासून तर कुंजिर चौक,पी के चौक ते कोकणे चौक ते गोविंद यशदा चौक, सुदर्शन चौक, नाशिकफाटा मार्गे ते एमआयडीसी कॉर्नर भोसरी ते पुन्हा फिरून याच मार्गे कै बाळासाहेब कुंजीर क्रीडांगणावर या मरेथॉनचे समापन झाले.पहाटे ५.०० वा.गुलाबी थंडीत पिंपरी चिंचवड करांनी मोठया संख्येने उपस्थित राहून ही मॅरेथॉन स्पर्धा यशस्वी केली.
या वर्षीच्या या मॅरेथॉनचे वैशिष्ट्य म्हणजे ३ किमी फन रन स्पर्धा. यामध्ये हौशी धावपटू ज्याना फक्त आनंद लुटण्यासाठी पळवायचे आहे खास त्यांच्यासाठी ३ किमी फन रनचे आयोजन करण्यात आले होते . या स्पर्धेमध्ये ५ किमी , १० किमी आणि २१ किमी या तिन्ही ग्रुप कॅटेगरी मिळून साधारण ३५०० मॅरेथॉनपटूनी सहभाग घेतला होता.लहान मुलांपासून अबाल वृद्धापर्यंत या हाफ मॅरेथॉन स्पर्धेत सहभाग घेत सर्व जण मनसोक्त धावले. यावेळी धावपटूचा उत्साह वाढावा म्हणून जागोजागी ढोल वाजवून त्यांचे स्वागत केले जात होते.स्पर्धेदरम्यान चार ठिकाणी एनर्जी स्टेशन उभे करण्यात आले होते आणि तिथून स्पर्धकांना पिण्यासाठी पाणी, एनर्जी ड्रिंक,मोसंबी,केळी,खजूर इ. पुरविण्यात आले होते . स्पर्धेदरम्यान रुग्णवाहिका तैनात करण्यात आली होती. स्पर्धेसाठी साधारण १०० स्वयंसेवक उपस्थित होते.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जेष्ठ नेते भाऊसाहेब भोईर, चंद्रकांत अण्णा नखाते,अॅड. राजेश जाधव, विवेक जोशी, सूर्यकांत जाधव , बाबा त्रिभूवन, सुरेश भोईर, मोरेश्वर शेडगे, राजेंद्र गावडे,श्री संदिप गाडे, कैलास कुंजीर, राजाभाऊ मासुळकर , अरुण चाबुकस्वार, कुंदा भिसे, रोहिदास गवारे, गोपाळ माळेकर, शंतनू प्रभुणे, किरण काकुलते, प्रविण कुंजीर, बाळकृष्ण परघळे, दिपक गांगुर्डे, रेडिओ जॉकी आर जे तरुण आदी उपस्थित होते.