ताज्या घडामोडीपिंपरी

पात्र ठरलेल्या सदन‍िकाधारकांना पीएमआरडीएकडून आवाहन

Spread the love

पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या एकूण १३३७ शिल्लक असलेल्या सदनिकांच्या लॉटरीमध्ये १२ फेबुवारीला १०१५ लाभार्थी पात्र झाले आहेत. पात्र लाभार्थ्यांनी १७ ते २५ फेबुवारीपर्यंत सदनिका स्वीकारणे अथवा समर्पित करणेबाबत संबंध‍ितांच्या लॉग‍िनला पत्र पाठविण्यात आले आहे.

पात्र लाभार्थ्यांनी सदनिका स्वीकारल्यानंतर त्यांना तात्पुरते देकारपत्र देण्यात येणार येणार आहे. त्यामध्ये प्रथम टप्प्यातील २५% रक्कमेचा भरणा करण्याचा कालावधी संपुष्टात आल्यानंतर (तात्पुरत्या देकारपत्राच्या दिनांकापासून ४५ दिवसानंतर) SBI च्या MCLR दराप्रमाणे व्याज आकारणीच्या अधिनराहून १५ दिवसांची मुदतवाढ देण्यात येईल. या कालावधीतही (तात्पुरत्या देकारपत्राच्या दिनांकापासून ६० दिवसांत) प्रथम टप्प्यातील २५% रक्कम न भरल्यास सदनिकेचे वितरण कोणतीही पूर्वसूचना न देता रद्द करण्यात येईल.

टप्पा १ च्या मुदतीनंतर पुढील ६० दिवसांत सदनिकेची उर्वरित ७५% रक्कम भरणे बंधनकारक आहे. सदर कालावधीतही (७५% रक्कमेकरिता ६० दिवस) अर्जदाराने ७५% रक्कम भरणा न केल्यास, १०५ दिवसांचा विहित कालावधी संपुष्टात आल्यानंतर MCLR नियमाप्रमाणे व्याज आकारणीच्या अधीनराहून अर्जदारास अधिकतम ९० दिवसांची मुदतवाढ देण्यात येईल. ज्या अर्जदारांना १००% रक्कम एकाच वेळेस भरणा करावयाची आहे, असे अर्जदार सदर रक्कमेचा भरणा उपरोक्त नमूद केलेल्या टप्प्याच्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीने त्याचा भरणा एकाच दिवशी करू येवू शकता.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button