द इंडियन हेड इंजुरी फाउंडेशन नवी दिल्ली यांच्या माध्यमातून खास शालेय विद्यार्थ्यांकरीता बनवलेल्या मोफत हेल्मेट वाटपाचा कार्यक्रम संपन्न


पुणे, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – रस्ता सुरक्षा सप्ताहाच्या निमित्ताने आठ वर्षा खालील विद्यार्थ्यांसाठी हिरो कंपनीच्या सीएसआर फंडातून 5000 मोफत हेल्मेट पुणे महाराष्ट्र मध्ये इंडियन हेड इंजुरी फाउंडेशन यांच्या माध्यमातून शालेय विद्यार्थ्यांच्या मोफत हेल्मेटचे वाटप करण्यात येणार आहे शालेय विद्यार्थ्यांना रस्ता सुरक्षा चे ज्ञान व्हावे यासाठी इंडियन हेड इंजुरी फाउंडेशन यांच्यावतीने रस्ता सुरक्षा बाबतच्या ट्रॅफिक एज्युकेशन क्विझ प्रश्नपत्रिका द्वारे 5000 शालेय विद्यार्थ्यांना वाहतुकीचे ज्ञान होण्यासाठी या प्रश्नपत्रिकेच्या माध्यमातून शालेय विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्यात येणार आहे .



तसेच वाहतुकीची समस्या गिव्ह वे टू ॲम्बुलन्स फर्स्ट अपघात व अपघाताची कारणे हेल्मेटचा वापर व वाहन चालकांची सुरक्षितता चार चाकी वाहनासाठी सीट बेल्टचा वापर वापर वाहतुकीचे नियम पाळा मोटार वाहन कायद्यातील तरतुदी बाबतचे ज्ञान या सर्व विषयांवर पाच हजार विद्यार्थ्यांचे चित्रकला स्पर्धा व 2000 शालेय विद्यार्थ्यांचे वरील विषयाच्या संदर्भात निबंध स्पर्धा चे आयोजन करण्यात येणार आहे प्रत्येक इयत्तेतील पहिल्या तीन विद्यार्थ्यांना त्याबद्दल पारितोषिक सुद्धा प्रदान करण्यात येणार आहे संपूर्ण पुणे शहर व परिसरातील शालेय विद्यार्थ्यांसाठी 5000 मोफत हेल्मेट चे वाटप हेड इंजुरी फाउंडेशन नवी दिल्ली यांच्या वतीने करण्यात येणार आहे.

ब्ल्यू हेवन इंग्लिश मीडियम स्कूल महादेव नगर शेलार मळा कात्रज पुणे 46 या शाळेतील 510 शालेय विद्यार्थ्यांसाठी मोफत हेल्मेट वाटपाचा कार्यक्रम आज रोजी संपन्न झाला या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी माननीय अनिल वाळीव रस्ता सुरक्षा विभाग परिवहन आयुक्त कार्यालय मुंबई उप प्रादेशिक परिवहन अधिकारी पुणे यांच्या शुभहस्ते विद्यार्थ्यांना हेल्मेट वाटप करण्यात आले. सदर प्रसंगी रस्ता सुरक्षा या विषयावर व रस्ता सुरक्षा बाबतच्या अवॉर्ड विनिंग ॲनिमेटेड फिल्म चे माध्यमातून रस्ता सुरक्षा चा प्रचार व प्रसार करणारे अभिजीत गायकवाड मोटार वाहन निरीक्षक पुणे, पद्माकर विश्ववे मोटार वाहन निरीक्षक पुणे, अभिजीत कांबळे सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक पुणे ,सुप्रिया सरवदे सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक पुणे या मान्यवरांनी शालेय विद्यार्थ्यांना हेल्मेट वापराचे महत्व रस्ता सुरक्षा याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
सदर प्रसंगी राजू घाटोळे अध्यक्ष मोटार ड्रायव्हिंग स्कूल ओनर्स असोसिएशन महाराष्ट्र राज्य यांनी प्रास्ताविक केले. व सदर कार्यक्रमाच्या आयोजनाचा हेतू उपस्थित विद्यार्थी व पालक यांना समजून सांगितला. ब्ल्यू हेवन इंग्लिश मीडियम स्कूलच्या मुख्याध्यापिका अर्चना पांडे संस्था संचालक सुरेंद्र घैसास , बसंत कुमार भाटिया व शाळेतले सर्व शिक्षक व शिक्षिका व पालक सदर कार्यक्रमाला उपस्थित होते.
मोटार ड्रायव्हिंग स्कूल असोसिएशनच्या वतीने सुरज देवकर ओमकार जाधव निलेश गांगुर्डे गणेश बाजारे चंद्रकांत माळवदे प्रशांत बिराजदार अनिल भिसे सर स्ट्रीट सेन्स फाउंडेशन पुणे जितेंद्र जोशी ड्रायव्हिंग स्कूल संचालक सदर प्रसंगी उपस्थित होते आभार प्रदर्शन ब्ल्यू हेवन इंग्लिश मीडियम स्कूलच्या मुख्याध्यापिका अर्चना पांडे मॅडम यांनी केले उपक्रमाचे आयोजन हेड इंजुरी फाउंडेशन नवी दिल्ली यांनी केले. सदर उपक्रम महाराष्ट्रात राबवण्यासाठी सर्व जबाबदारी दिलीप कुमार पांडा ओरिसा सेफ इंडिया व राजू घाटोळे मोटार ड्रायव्हिंग स्कूल ओनर्स असोसिएशन महाराष्ट्र राज्य यांनी पार पाडली.








