ताज्या घडामोडीपिंपरी

दिल्लीचे तख्त पलटवु शकतो, ही महाराष्ट्राची ताकद आहे – डॉ. अमोल कोल्हे

Spread the love

 

राजगुरूनगर ,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – सध्याच्या परिस्थितीत विचारांचा वारसदार असणं फार महत्वाच आहे. देशाच्या निवडणुकीत महाराष्ट्राची जबाबदारी फार मोठी आहे. देशाने निर्णय घेतलाय. देशातलं वातावरण बदलत आहे. त्यामुळेच दिल्लीचे ही तख्त पलटवण्याची ताकद महाराष्ट्राच्या मनगटात आहे, असे प्रतिपादन खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केलं.

महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार खासदार डॉ. अमोल कोल्हे आज खेड विधानसभेच्या दौऱ्यावर आहेत. त्यावेळी ग्रामस्थांसोबत डॉ. कोल्हे यांनी संवाद साधला.यावेळी अशोक खंडेभराड, अतुल देशमुख, बाबाजी काळे, सुधीर मुंगसे, हिरामण सातकर, संजय घनवट, शिवाजी वर्पे, विशाल झरेकर, राजमाला बुट्टे, श्रद्धा सांडभोर, मनीषा सांडभोर, नीलिमा राक्षे, उषा बोराडे, अलका जोगदंड त्यांच्या समवेत सहभागी होते.

डॉ. कोल्हे म्हणाले की, अमरावतीचे भाजपचे उमेदवारच सांगत आहेत की, पंतप्रधान मोदींची लाट आता राहिलेली नाही. हेच चित्र सगळ्या देशात आहे. दक्षिण भारत असो की ईशान्य भारतासह अनेक राज्यात भाजप नाही.

या परिस्थितीत महाराष्ट्रतल्या माणसांची जबाबदारी मोठी आहे. आतापर्यंत आपण म्हणत होतो दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा, आता मात्र, दिल्लीचे ही तख्त पलटवू शकतो महाराष्ट्र माझा, ही महाराष्ट्राच्या मनगटातली ताकद दाखवून द्यायची आहे, अस आवाहन ही डॉ. कोल्हे यांनी केलं.

चौकट
कोणाची शेवटची निवडणूक आहे म्हणून आपले प्रश्न सुटणार नाहीत

देश पातळीवरची निवडणूक असली तरी विरोधकांकडे प्रचाराचे मुद्दे नाहीत. म्हणून ते वैयक्तिक पातळीवर येऊन टीका करत आहेत. विरोधी उमेदवार सुरवातीला म्हणाले, २०१९ चा बदला घेण्यासाठी निवडणूक लढवायची, आता वारं बदललं हे लक्षात आल्यावर म्हणतात माझी शेवटची निवडणूक आहे. पण कोणाची पहिली निवडणूक असो किंवा शेवटची. त्याने आपले प्रश्न सुटणार नाहीत. महागाई कमी होणार नाही, की हाताला काम मिळणार नाही. याचाही विचार मतदारांनी करावा, असेही डॉ. कोल्हे म्हणाले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button