पिंपळे सौदागरमधील युवा पिढीची राष्ट्रीय पातळीवर सुवर्ण भरारी हा एक अभिमानास्पद क्षण : शत्रुघ्न काटे
पिंपळे सौदागर, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – नागपूर येथे झालेल्या थाईबॉक्सिंग राष्ट्रीय स्पर्धेमध्ये पिंपळे सौदागर येथील यु.एफ.एफ.सी क्लबचे विद्यार्थी यांनी कु.अवनिश गंगमवर, कु. ईशान बोंगाळे,कु.आयुष मिश्रा आणि कु.लक्ष्य मांजरेकर यांनी वयोगट १२ वर्षे , १४ वर्षे आणि १८ वर्षे थायबॉक्सिंग स्पर्धेमध्ये “सुवर्ण पदक” मिळविल्याबद्दल नगरसेवक शत्रुघ्न काटे यांनी सुवर्ण भरारी घेणाऱ्या या सर्व स्पर्धकांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले .
आपल्या परिसराचे नाव राष्ट्रीय पातळीवर अधोरेखित करण्याची किमया या नव्या पिढीने करून दाखविले . पुढील काळात अशीच घवघवीत यश संपादन करून पिंपळे सौदागरचे नाव देश पातळीवर तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहचवा अश्या शुभेच्छा ही दिल्या.
यावेळी पिंपरी चिंचवड थाई बॉक्सिंग अध्यक्ष नरेश म्हेत्रे , प्रशिक्षक पल्लवी पाटील व पालक उपस्थित होते.