पिंपरीताज्या घडामोडी

लहुवंदना पाठांतर स्पर्धेचे १६ फेब्रुवारीला बक्षीस वितरण

Spread the love

पिंपरी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – क्रांतिवीर चापेकर स्मारक समिती आणि मंगल प्रवाह सोशल कॅम्पिनिंग यांच्या वतीने ०१ जानेवारी २०२५ ते २६ जानेवारी २०२५ या दरम्यान भव्य लहुवंदना पाठांतर स्पर्धा घेण्यात आल्या. स्पर्धेत शालेय व शाळाबाह्य अशा एकूण ६७० स्पर्धकांनी सहभाग घेऊन उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा रविवार, दिनांक १६ फेब्रुवारी २०२५ रोजी सायंकाळी ठीक पाच वाजता स्वातंत्र्यवीर सावरकर भवन, निगडी प्राधिकरण येथे आयोजित करण्यात आला आहे.

पिंपरी विधानसभा आमदार अण्णा बनसोडे यांच्या शुभहस्ते तसेच ‘सैराट’फेम सुप्रसिद्ध अभिनेते सुरेश विश्वकर्मा, महाराष्ट्र शासन आद्यक्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे स्मारक समितीचे अशोक लोखंडे, महाराष्ट्र शाहीर परिषद अध्यक्ष प्रकाश ढवळे, चित्रपटलेखक संजय नवगिरे, क्रांतिवीर चापेकर स्मारक समिती अध्यक्ष पद्मश्री गिरीश प्रभुणे, उपाध्यक्ष डॉ. अशोक नगरकर, कार्यवाह ॲड. सतीश गोरडे, मंगल प्रवाह सोशल कॅम्पिनिंगचे अध्यक्ष अनिल सौंदडे, सचिव महेश खिलारे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा संपन्न होणार असून यावेळेस इतिहासाचे अभ्यासक प्रा. अंबादास सकट आणि सामाजिक कार्यकर्त्या अपर्णा कुलकर्णी यांची व्याख्याने होणार आहेत.

सहभागी स्पर्धक आणि शहरातील नागरिक यांनी या सोहळ्याला आवर्जून उपस्थित राहावे, असे आवाहन संयोजन समितीच्या वतीने शाहीर आसराम कसबे यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button