नाना काटे यांच्या पाठपुराव्यास यश कुणाल आयकॅान रस्ता होणार अर्बन स्ट्रीट डेव्हलपमेटं नुसार होणार विकसित स्थायी समितीच्या बैठकीत ५५ कोटीचा निधी मंजुर
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – रहाटणी पिंपळे सौदागर मधील ९ मीटर ते ४५ मीटर पर्यत संपुर्ण रस्ते आत्याधुनिक पध्दतीने विकसीत झाले आहेत. परंतु शिवार चौक ते गोविदं गार्डन चौक कुणाल आयकॅान रस्ता हा परिसरातील मुख्य रस्ता असुन या रस्त्या लगत मोठ्या रहिवाशी सोसायट्या,व्यवसायीक दुकाने, रूगणालय, बॅक, हॅाटेल, शाळा असुन नागरिकांना वाहतुक कोडीं ला सामोरे जावे लागत होते, हा रस्ता लवकरात लवकर विकसीत व्हावा यासाठी नाना काटे यांनी वेळोवेळी आयुक्त तथा मनपाचा संबधीत स्थापत्य प्रकल्प विभाग व इतर विभागाशी प्रत्यक्ष भेटुन व पत्र व्यवहार केला होता.नाना काटे यांच्या पाठपुराव्यास यश कुणाल आयकॅान रस्ता होणार अर्बन स्ट्रीट डेव्हलपमेटं नुसार विकसीत स्थायी समितीच्या बैठकीत ५५ कोटीचां निधी मंजुर करण्यात आला.
काहीच दिवसापुर्वी मनपा स्थापत्य प्रकल्प विभागाचे अधिकारी व सल्लागार कंपनी यांच्या सोबत या रस्त्याची पाहणी देखील नाना काटे यांनी केली होती, हा शिवार चौक ते गोविंद गार्डन पर्यत चा १८ मीटर व १२ मीटर रस्ता विकसीत करताना, नागरिकाचा सुरक्षिततेच्या दृष्टीने आत्याधुनिक पध्दतीने विकसीत व्हावा, अशा सुचना केल्या होत्या ज्यामधे प्रशस्त रस्ता, फुटपाथ, सायकल ट्रॅक, मोठ्या क्षमतेची स्ट्रॅाम वॅाटर लाईन, पिण्याच्या पाण्याची लाईन, विद्युत केबल, पथदिवे, दिशा दर्शक फलक व इतर आधुनिक गोष्टीचा वापर होवुन हा रस्ता विकसीत करण्यात यावा अशा सुचना या रस्त्याचा पाहणी वेळी केल्या होत्या त्यानुसार काल झालेल्या स्थायी समिती च्या बैठकी मध्ये हा रस्ता अर्बन स्ट्रीट डेव्हलपमेटं नुसार आत्याधुनिक पध्दतीने विकसीत करण्यासाठी ५५ कोटी चा निधी मंजुर करण्यात आला आसुन त्या पाठपुराव्याला आज यश आले आहे, हा रस्ता आत्याधुनिक पध्दतीने विकसीत केल्याने रहाटणी पिपंळे सौदागर चा विकासत आणखी भर पडणार असुन कुणाल आयकॅान रस्त्या वरील वाहतुकीच्या त्रासातुन व नागरिकांची सुटका होणार आहे.