ताज्या घडामोडीपिंपरी

लोणीकंद ते तुळापूर फाटा रस्त्याच्या दुतर्फा असलेली अतिक्रमने पीएमआरडीएच्या पथकाकडून न‍िष्कास‍ित

Spread the love

 

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – अनाधिकृत बांधकाम, पत्राशेडसह इतर अनाधिकृत बांधकामांवर पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या अनधिकृत बांधकाम व न‍िर्मुलन व‍िभागाकडून कारवाई करण्यात येत आहे. गत दोन द‍िवसात लोणीकंद ते तुळापूर फाटा रस्त्याच्या दुतर्फा असलेली तसेच इतर ठ‍िकाणची एकूण ८७ अतिक्रमने पथकाच्या माध्यमातून न‍िष्कास‍ित करण्यात आली. या कारवाईदरम्यान काही नागर‍िकांनी पीएमआरडीएच्या पथकाला सहकार्य करत स्वत: ची अतिक्रमने काढून घेतली.

कटकेवाडी, लोणीकंद ते तुळावर फाटा रस्त्याच्या दुतर्फा उभारण्यात आलेली ३५ पत्राशेडची अतिक्रमने बुधवारी (दि.५) पीएमआरडीएच्या पथकाने न‍िष्कास‍ित केली. तर गुरुवारी (दि.६) तुळापूर फाटा ते पेरणे फाटा रस्त्याच्या दुतर्फा असलेली ५२ अतिक्रमने काढण्यात आली. गत आठवडयाभरात सव्वा पाचशेपेक्षा अध‍िक अतिक्रमनावर पीएमआरडीएच्या अनधिकृत बांधकाम व न‍िर्मुलन व‍िभागाच्या पथकाने कारवाई केली. यात अतिक्रमित व अनधिकृत बांधकाम केलेले दुकाने, आरसीसी स्ट्रक्चर, सीमा भिंती, तात्पुरते पत्राशेड, होर्डिंग्ज आदी हटविण्यात आले.

सदर कारवाई पीएमआरडीएचे महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे, पोलिस अधिक्षक तथा दक्षता अधिकारी अमोल तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली अनधिकृत बांधकाम व न‍िर्मुलन व‍िभागाच्या स‍ह आयुक्त (प्र) डॉ. दीप्ती सूर्यवंशी – पाटील, उपजिल्हाधिकारी प्रमोद कुदळे, तहसीलदार सचिन मस्के, तहसीलदार रविंद्र रांजणे, कनिष्ठ अभियंता अभिनव लोंढे, विष्णू आव्हाड, गणेश जाधव, हरीश माने, सागर जाधव, दीपक माने, प्रशांत चौगुले, प्रणव डेंगळे, ऋतुराज सोनावणे, तेजस मदने यांनी पार पाडली.

– डॉ. ज्ञानेश्वर भाले, जनसंपर्क अधिकारी, पीएमआरडीए

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button