शिवभोजन व आनंदाचा शिधा बंद केल्यास आंदोलन – काशिनाथ नखाते
महाराष्ट्र राज्यात तब्बल २ लाख कोटींची तूट


सर्वसामान्य नागरिकांनी कष्टकरी कामगारांसाठी दोन्ही योजना महत्त्वाच्या



पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – महाराष्ट्र शासनाच्या तिजोरीत लाडकी बहीण योजनेमुळे खडखडाट असून तब्बल २ लाख कोटींची तूट झाल्याचे दिसून येत असून या एक योजनेच्या लाभासाठी इतर सर्वसामान्य आणि कष्टकरी कामगारांसाठी असणाऱ्या अनेक योजना बंद करण्याचा विचार सरकार करत आहे त्यामध्ये शिवभोजन आणि आनंदाचा शिधा या योजना जर बंद विचाराधीन आहे त्या बंद केल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा राष्ट्रवादी असंघटित कामगार विभाग प्रदेशाध्यक्ष काशिनाथ नखाते यांनी दिला.

महाविकास आघाडी सरकारने शिव भोजन थाळी ही सर्वसामान्य नागरिकांसाठी योजना सुरू केली महाराष्ट्रात दररोज १ लाख ९० हजार शिवभोजन थाळीचा लाभ सर्वसामान्य नागरिक घेत आहेत. मात्र आधीच्या सरकारची योजनेला म्हणून विरोध म्हणून गेल्या अनेक दिवसांपासून केंद्र चालकांना निधी न देणे अशा विविध मार्गाने ही योजना बंद पाडण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्याचबरोबर दिवाळी, शिवजयंती , डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त आनंदाचा शिधा म्हणून ४ वस्तू १०० रुपयात दिल्या जातात ही योजनाही बंद करण्याचा प्रयत्न सरकार करीत आहे.
नुकतेच अर्थ खात्याने याबाबत आढावा बैठक घेऊन तसे प्रयत्न सुरू केले आहेत, वास्तविक लाडकी बहीण योजनेमुळे राज्याच्या तिजोरीवर ९० हजार कोटींचा अतिरिक्त भार पडलेला आहे आणि राज्यात तब्बल २ लाख कोटी रुपयांची तूट आहे सरकार किमान १ लाख कोटीची तूट भरून काढण्यासाठी प्रयत्न करीत असून मोठे उद्योग आणि श्रीमंतासाठीच्या योजनेला आळा घालण्या ऐवजी सर्वसामान्यांच्या हिताच्या योजना बंद करून सामान्य नागरिकांचे नुकसान करण्याचा प्रयत्न करीत आहे त्याला विरोध असून लवकरच आंदोलन करण्यात येईल असा इशारा दिला आहे .








