दुसऱ्या मातंगऋषी साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी शंकर जगताप यांची निवड
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – दुसऱ्या मातंगऋषी साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी शंकर जगताप यांची निवड आज चिंचवड येथे झालेल्या मातंग साहित्य परिषदेच्या बैटकीत निश्चित करण्यात आली. या बैठकीला मा.हेमंतजी हरहरे,मा.नरेंद्रजी पेंडसे,साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे महामंडळाचे माजी अध्यक्ष अमितजी गोरखे,मल्हार मार्तंड देवस्थान जेजुरीचे विश्वस्त अनिल सौंदडे व मातंग साहित्य परिषदेचे संस्थापक/अध्यक्ष डॉ.धनंजय भिसे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.या बैटकित मा.शंकर जगताप यांच्या नावाची निवड निश्चित केली. त्यानंतर मा. शंकर जगताप यांना बैठकीची ठिकाणी बोलवून त्यांचा सन्मान करण्यात आला.
दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांचे धाकटे बंधू असून विद्यमान आमदार अश्विनीताई जगताप यांचे ती दीर आहेत. शंकर जगताप हे शिक्षण,भारतीय संस्कृती व अध्यात्म या क्षेत्रामध्ये त्यांनी अनेक भरीव कामे केली आहेत. तसेच ते सध्या भारतीय जनता पार्टीचे पिंपरी चिंचवड शहराचे अध्यक्ष आहेत.
दुसरे मातंगऋषी साहित्य संमेलन हे येत्या ११ फेब्रुवारी २०२४ रोजी पिंपरी चिंचवड येथील राजवाडा लॉन्स,काळेवाडी येथे ह्या साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात येणार आहे.
दुसरे मातंग ऋषी साहित्य संमेलन हे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व साहित्यीक पद्मश्री गिरीश प्रभुणे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार आहे. मातंगऋषीच्या नावाने साहित्य संमेलन जगाच्या पाठीवर फक्त मातंग साहित्य परिषद,पुणे ही साहित्यीक संस्था भरवते.अशी माहिती मातंग साहित्य परिषदेचे संस्थापक/अध्यक्ष डॉ धनंजय भिसे यांनी दिली.