पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आयटीआय मोरवाडी व कासारवाडी येथे प्रवेश प्रक्रिया सुरू
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आयटीआय मोरवाडी व आयटीआय मुलींची कासारवाडी येथे विविध प्रकारचे इंजीनियरिंग, नॉन-इंजिनिअरिंग व्यवसाय उपलब्ध असून उमेदवारांची मोठ्या प्रमाणात मागणी असते.
महानगरपालिकेमार्फत किमान प्रशिक्षण शुल्क आकारून विद्यार्थ्यांना तांत्रिक प्रशिक्षण उपलब्ध करून देण्यात येते व रोजगाराच्या संधीही उपलब्ध करून देण्यात येतात.
संस्थेचे अनेक विद्यार्थी विविध क्षेत्रात रोजगार करत आहेत तसेच काही विद्यार्थ्यांनी स्वतःचे व्यवसाय सुरू केलेले असून संस्थेचे कार्य यशस्वीपणे सुरू आहे
यावर्षी, केंद्रीय प्रवेश प्रक्रिया २०२४ अंतर्गत ऑनलाईन फॉर्म भरण्याची सुविधा दोन्ही संस्थांमध्ये निशुल्क उपलब्ध करून देण्यात आलेली असून फॉर्म भरणे व कन्फर्म करण्याची अंतिम तारीख ३० जून आहे, तरी प्रवेशउत्सुक उमेदवारांनी याबाबत नोंद घेऊन ऑनलाइन फॉर्म भरण्याकरिता संस्थेमध्ये उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात येत आहे.
सुट्टीच्या दिवशीही फॉर्म भरण्याची प्रक्रिया सुरू आहे,अशी माहिती औद्योगिक प्रशिक्षण विभागाचे प्राचार्य शशिकांत पाटील यांनी दिली.