ताज्या घडामोडीपिंपरी

पीएमआरडीएमध्ये  कार्यालयीन वेळेत  मोबाईल वापरण्यास बंदी

Spread the love

 

पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – कार्यालयीन वेळेत मोबाईलच्या अतिवापरामुळे कामकाजावर परिणाम होत असल्याने कंत्राटी मनुष्यबळाने न‍िर्धारीत कार्यालयीन वेळेत मोबाईल वापरू नये, असे आदेश पीएमआरडीएमध्ये लागू करण्यात आला आहे. बाह्यस्त्रोत यंत्रणेमार्फत घेतलेल्या कंत्राटी मनुष्यबळाने संबंध‍ित आदेश लागू असून त्याची अंमलबजावणी कंत्राटी एजन्सीने सुरू केली आहे.

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण कार्यालयात ४०७ पदांचा आकृतीबंध मंजूर झालेला आहे. या मंजूर आकृतीबंधातील प्रतिनियुक्तीसह आस्थापनेवरील मोठ्या प्रमाणात पदे रिक्त आहेत. प्रतिनियुक्तीची पदे शासनाकडून उपलब्ध होईपर्यंत तसेच सरळसेवेच्या पदांची बिंदू नामावली मंजूर होऊन सदरील पदे एमपीएससी व जिल्हा निवड समितीमार्फत भरती करण्यास काही कालावधी अपेक्षित आहे. संबंध‍ित पद भरती होईपर्यंत पीएमआरडीएने बाह्यस्तोत्र एजन्सी नियुक्त करून त्यांच्यामार्फत कंत्राटी मनुष्यबळ नियुक्त केले आहे.

या बाह्यस्त्रोत एजन्सीमार्फत पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामध्ये कार्यरत मनुष्यबाळाकडून कार्यालयीन वेळेत मोबाईलचा वापर होत असल्याने कामकाजात अडचणी निर्माण होत आहेत. गोपनीयतेचा भंग होऊ नये व कार्यालयीन शिस्तीचा भाग म्हणून कार्यालयीन वेळेत संबंधित कंत्राटी मनुष्यबळाने कार्यालयीन वेळेत मोबाईलचा वापर करण्यास बंदी घालण्यात आली असून कंत्राटी एजन्सीकडून त्यांची अंमलबजावणी सुरु झाली आहे. या निर्णयामुळे संबंधित कर्मचारी पूर्णवेळ कामकाजात व्यस्त राहणार असल्याने कार्यालयीन कामकाजात अध‍िक सुरळीतपणा येण्यास मदत होईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button