चिंचवडताज्या घडामोडी

चिंचवड विधानसभा मतदारसंघात सरासरी ५६ टक्के मतदान, चिंचवडला कमळ फुलणार की तुतारी वाजणार

Spread the love

चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – चिंचवड विधानसभा मतदारसंघात सुरुवातीला दिसणारी तिरंगी लढत मात्र दुरंगीच झाल्याचे चित्र दिसत आहे. महायुतीचे शंकर जगताप आणि महाविकास आघाडीचे राहुल कलाटे यांच्यातच थेट सामना झाला असल्यास बोललं जात आहे. त्यामुळे या मतदारसंघात जगताप पॅटर्न चालणार की कलाटे बाजी मारणार याकडे सर्वच राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. चिंचवड विधानसभा मतदारसंघात सरासरी ५६ टक्के एवढे मतदान झाले असल्याची माहिती निवडणूक विभागाकडून देण्यात आली आहे.
मतदार संघात सकाळी सात वाजल्यापासून मतदारांच्या लांबच्या लांब रांगा लागल्या होत्या. नऊ वाजेपर्यंत ६.८० टक्के एवढे मतदान झाले आहे. तर ११ वाजेपर्यंत १६.९७ टक्के मतदान झाले होते. दुपारी १ वाजेपर्यंत २९.३४ टक्के मतदान झाले आहे. दुपारी ३ वाजेपर्यंत ४०.४३, तर सकाळी ५ वाजेपर्यंत ५०.०१ टक्के एवढे मतदान झाले होते.
सकाळी ९ वाजेपर्यंत झालेले अंदाजित मतदान
पुरुष :- २७१६४
स्त्री :- १७९७४
इतर :- ००
एकूण :- ४५१३८
टक्केवारी :- ६.८०
सकाळी ११ वाजेपर्यंत झालेले अंदाजित मतदान
पुरुष :- ६५४३२
स्त्री :- ४७२१४
इतर :- ०१
एकूण :-११२६४७
टक्केवारी :- १६.९७
दुपारी १ वाजेपर्यंत झालेले अंदाजित मतदान
पुरुष :- १०९१६८
स्त्री :- ८५५५४
इतर :- ०२
एकूण :-१९४७२४
टक्केवारी :- २९.३४
दुपारी ३ वाजेपर्यंत झालेले अंदाजित मतदान
पुरुष :- १४५५१२
स्त्री :- १२२८०७
इतर :- ०४
एकूण :-२६८३२३
टक्केवारी :- ४०.४३
दुपारी ५ वाजेपर्यंत झालेले अंदाजित मतदान
पुरुष :- १७५३०५
स्त्री :- १५६५४९
इतर :- ०७
एकूण :-३३१८६१
टक्केवारी :- ५०.०१
चिंचवड विधानसभा मतदारसंघात सरासरी ५६ टक्के एवढे मतदान झाले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button