भोसरी विधानसभा मतदारसंघात ६१.१४ टक्के मतदान, भोसरीत आमदार महेश लांडगे यांची हॅटट्रिक की नवीन चेहरा
भोसरी, ( महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – भोसरी विधानसभा मतदारसंघात ६१.१४ टक्के एवढे मतदान झाले असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. गेल्या पंचवार्षिक मध्ये भोसरी विधानसभेत ६५.६१ टक्के एवढे मतदान झाले होते. आता मतदानचा घसरलेला टक्का नेमका कोणाच्या फायद्याचा ठरणार हे २३ तारखेला स्पष्ट होणार आहे.
भोसरी विधानसभेत महायुतीचे महेश लांडगे आणि महाविकास आघाडीचे अजित गव्हाणे यांच्यात थेट लढत झाली होती. ही लढत अत्यंत चुरशीची ठरली होती. ६१.१४ टक्के एवढे मतदान झाले असल्याची माहिती सूतकडून मिळत आहे. दरम्यान गेल्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघात ६५.६१ टक्के एवढे मतदान झाले होते आता झालेले कमी मतदान नेमके कोणाच्या फायद्याचे ठरणार हे शनिवारी दि. २३ रोजी स्पष्ट होणार आहे.
भोसरी गावठाण परिसर तसेच समाविष्ट गावात सकाळपासूनच मतदानासाठी मतदारांच्या लांबच्या लांब रांगा लागल्या होत्या. नऊ वाजेपर्यंत ६.२१ टक्के एवढे मतदान झाले होते. अकरा वाजेपर्यंत १६.८३ टक्के मतदान झाले. दुपारी १ वाजेपर्यंत ३०.४१ टक्के मतदान झाले. दुपारी ३ वाजेपर्यंत ४३.१६ टक्के मतदान, तर सकाळी ५ वाजेपर्यंत ५५.०८ टक्के मतदान झाले आहे.
२०७ भोसरी विधानसभा मतदारसंघ
सकाळी ००:०७ ते ०९:०० वाजेपर्यंत झालेले अंदाजित मतदान
पुरुष :- २३५४५
स्त्री :- १४२३८
इतर :-००
एकूण :- ३७७८३
टक्केवारी :-०६.२१
सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंत झालेले अंदाजित मतदान.
पुरुष :- 60582
स्त्री :- 41838
इतर :- 01
एकूण :- 102421
टक्केवारी :- 16.83
सकाळी 07:00 ते 01:00 वाजेपर्यंत झालेले अंदाजित मतदान.
पुरुष :- 105973
स्त्री :- 79044
इतर :- 05
एकूण :- 185022
टक्केवारी :- 30.41
सकाळी 07:00 ते 03:00 वाजेपर्यंत झालेले अंदाजित मतदान.
पुरुष :- 143482
स्त्री :- 119105
इतर :- 09
एकूण :- 262596
टक्केवारी :- 43.16
सकाळी 07:00 ते 05:00 वाजेपर्यंत झालेले अंदाजित मतदान.
पुरुष :- 178844
स्त्री :- 156263
इतर :- 13
एकूण :- 335120
टक्केवारी :- 55.08
207 – भोसरी विधानसभा एकूण टक्केवारी: 61.14%
एकूण मतदान : 3,71,991