भारतीय न्याय संहितेत महिलांवरील गुन्ह्यांची इतर गोष्टींच्या तुलनेत प्राधान्याने दखल आळंदीत पोलीस, नागरिक, शांतता कमेटी बैठक
आळंदी ( महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – नवीन भारतीय न्याय संहितेत महिलां वरील गुन्ह्यांची इतर गोष्टींच्या तुलनेत प्राधान्याने दखल घेण्यात आली आहे. या कायद्यात महिला आणि मुलां विरुद्धच्या गुन्ह्यांवर जास्त लक्ष देऊन फिर्यादीस न्याय देण्यास भर देण्यात आला असल्याची माहिती आळंदी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भीमा नरके यांनी दिली.
आळंदी पोलीस स्टेशन मध्ये आळंदी पोलीस स्टेशन अंतर्गत शांतता कमेटी, महिला दक्षता समिती, स्थानिक नागरिक, प्रतिष्ठित पदाधिकारी यांचे समवेत भारतीय न्याय संहिता, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता आणि भारतीय साक्ष्य कायदा हे नवीन तीन कायदे १ जुलै पासून कार्यान्वित होत आहेत. या बाबत संवाद बैठक आणि जनजागृतीसाठी मार्गदर्शन करताना आळंदी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भीमा नरके बोलत होते.
यावेळी शांतता समिती पदाधिकारी सदस्य डी.डी. भोसले पाटील, प्रकाश कुऱ्हाडे पाटील, आनंदराव मुंगसे, अर्जुन मेदनकर, संजय घुंडरे पाटील, पुष्पाताई कुऱ्हाडे पाटील, मंगलाताई हुंडारे, विकास भिवरे, पै. बाळासाहेब चौधरी, नाझीम शेख, सोयल शेख, अनिल शिंदे, महादेव कुऱ्हाडे, आरिफ शेख, पोलीस कर्मचारी जालिंदर जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक नरके यांनी बैठकीतील उपस्थितांचे प्रश्नांना समाधारक उत्तरे देत संवाद साधला. भारतीय न्याय संहितेमध्ये आता याबाबत एक स्वतंत्र अध्याय देण्यात आला आहे. नवीन फौजदारी कायद्यात इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल रेकॉर्ड मधील महत्त्वाच्या सुधारणा अधोरेखित करण्यात आल्या आहेत. कागदपत्रांच्या व्याख्येत इलेक्ट्रॉनिक / डिजिटल रेकॉर्ड्सच्या समावेशामुळे, या रेकॉर्डमध्ये देखील कागदपत्रांच्या समावेशकतेशी संबंधित सर्व विभागांची उपाय योजना वाढली आहे. यासाठी साधन सुविधा साहित्य उपलब्ध होणार आहेत. मात्र यासाठी काही वेळ लागणार आहे.
नवीन कायद्यातील तरतुदीं बाबत उपस्थितांना माहिती करून देण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. भारतीय दंड संहिता, फौजदारी प्रक्रिया संहिता आणि भारतीय पुरावा कायदा या जुन्या काळातील कायद्यांची जागा नवीन कायदे घेत आहेत. ते म्हणाले, नवीन कायद्यातील सेक्शन मध्ये बदल झाला आहे. कायद्यांचे कार्यवाहीत महत्त्वाचे बदल असून त्यांनी अधिक प्रभावीपणे फिर्यादीला न्याय मिळवून देण्यासाठी तीन कायद्यात बदल झाले असल्याचे सांगितले. नवीन कायदेशीर चौकटीत न्याय देण्याची जबाबदारी वाढली असून त्यांचे पालन करीत फिर्यादीला न्याय मिळणार आहे. कायद्यात महिला, मुलां विरुद्धच्या गुन्ह्यांवर लक्ष जास्त देण्यात आले आहे. भारतीय न्याय संहितेत एक स्वतंत्र प्रकरण देण्यात आले आहे. भारतीय प्रजासत्ताकातील अधिकृत फौजदारी संहिता आहे. भारतीय दंड संहिता बदलण्यास डिसेंबर २०२३ मध्ये संसदेने संमत केल्या नंतर १ जुलै २०२४ पासून बदल लागू झाले आहेत. या वेळी जुने दाखल आणि नवीन दाखल होणाऱ्या गुन्ह्याचे बाबत त्या त्या वेळचे अस्तित्वातील कायदे विचारात घेतले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
नवीन बदलल्या कायद्या बाबत नागरिकांना माहिती व्हावे. यासाठी जाहिरात फलक लावून जनजागृती हि केली जाणार आहे. नरके म्हणाले, जुने कायद्यात अमुलाग्र बदल करून फिर्यादीस न्याय देण्याचे दृष्टीने तीन कायदे तयार करण्यात आले. या कायद्याची नागरिकांना माहिती व्हावी यासाठी पोलिस स्टेशन मध्ये संवाद बैठक आयोजित करण्यात आली होती. यात पोलिसांचे अधिकार, बदल याबाबत सेक्शन प्रमाणे त्यांनी माहिती दिली गुन्हाचे स्वरूप त्या प्रमाणे शिक्षा, चॅप्टर वाइज करण्यात आले आहे महिलांचे,मुलांचे तसेच संघटित गुन्हेगारी आदी कायद्यांची सेक्शन ची नरके यांनी माहिती देत संवाद साधला. विवाह कायदे, अपहरण कायदे, अपघात प्रकरणे तसेच जुने नवे कायद्या प्रमाणे तक्रार, घटना कधी घडली यावर गुन्हा दाखल होणार आहे. यासाठी पोलिस प्रशासनाची ही जबाबदारी वाढली आहे. काही प्रकरणात हातकडी लावण्याचे अधिकार नव्हते. ते आता गुन्ह्याचे स्वरुपा नुसार अधिकार मिळाले आहेत. ३०९ सारखे कलम काढण्यात आले आहे. आत्महत्या ज्यांनी केली. त्यावर गुन्हा नोंद व्हायचा असे कायदे वगळण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले. पंच सरकारी कर्मचारी म्हणून गंभीर गुन्ह्यात पंच घेणं यासाठी संमती मिळाली आहे अनेक वेळा पंच मिळत नव्हते. ते मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. बदल झालेल्या सेक्शन बाबतची माहिती देत पोलिस निरीक्षक भीमा नरके यांनी संवाद साधला.
यासाठी बैठकीस जालिंदर जाधव, मच्छिंद्र शेंडे यांनी नियोजन केले. संवाद बैठक यशस्वी करण्यास वरिष्ठ पोलीस निरीक्षक भीमा नरके यांनी परिश्रम घेत मार्गदर्शन केले. या बैठकीत कोयाळीचे सरपंच पदी शांतता कमेटीचे सदस्य विकास भिवरे यांची निवड झाल्या बद्दल सत्कार करण्यात आला.