नवीन कायद्यांविषयी पिंपरी चिंचवड ॲडव्होकेट असोसिएशन कडून चर्चासत्राचे आयोजन
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी येथील नेहरूनगर न्यायालयात नवीन भारतीय न्याय संहिता (बीएनएस),भारतीय नागरिक सुरक्षा संहिता व भारतीय साक्ष अधिनियमन या कायदा विषयांवर असोसिएशन च्या वतीने चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. पूर्वीच्या कायद्यांमध्ये काही बदल करून शासनाने भारतीय न्याय सहिता (बीएनएस), भारतीय नागरिक सुरक्षा संहिता व भारतीय साक्ष अधिनियमन हे नवीन कायदे अस्तित्वात आणलेले असून या कायद्यांची अंमलबजावणी १ जुलै पासून संपूर्ण देशभर करण्यात येत आहे. या कायद्यामधील झालेले बदल या विषयी वकील बंधू व भगिनी यांना मार्गदर्शन व्हावे या हेतूने असोसिएशन च्या वतीने जिल्हा न्यायालयाचे मा.न्यायाधीश राजन गुंजीकर यांचे या कायद्यांविषयी चर्चा व मार्गदर्शन करण्याकरिता निमंत्रित करण्यात आले होते.
यावेळी असोसिएशनच्या अध्यक्षा ॲड.प्रमिला हरीश गाडे, उपाध्यक्ष ॲड.गोरख भागवत कुंभार, मा. ॲड.नारायण रसाळ, ॲड.सुनिल कडूसकर, ॲड.किरण पवार ॲड.सुदाम साने, ॲड.अरुण खरात यांच्या हस्ते या कार्यक्रमास मार्गदर्शक म्हणून लाभलेले जिल्हा न्यायालयाचे मा.न्यायाधीश श्री.राजन गुंजीकर यांचा पुष्पगुच्च देवून सत्कार करण्यात आला.
या चर्चासत्रामध्ये ॲड.बी.के.कांबळे, ॲड.जे.के.काळभोर, मा.उपाध्यक्ष ॲड.प्रतिक जगताप, ॲड. शशिकांत गावडे, ॲड.जयश्री कुटे,ॲड.कुलदीप बकाल, ॲड.महेश वाकळे, ॲड.श्रीधर येलमार, ॲड.थारा नायर, ॲड.मकरंद गोखले,ॲड.नारायण थोरात, ॲड.संगीता कुशलकर, ॲड.संकल्पा वाघमारे, ॲड.पूनम शर्मा, ॲड.पूनम राऊत, ॲड.पद्मावती पाटील,ॲड.सविता तोडकर, ॲड.रामचंद्र बोराटे, ॲड.तेजस चवरे ॲड.विशाल पौळ, ॲड.जयेश वागचौरे ॲड.पल्लवी कुऱ्हाडे, ॲड.विनोद आढाव, ॲड.सागर अडागळे, ॲड.संतोष महानवर, ॲड.संभाजी वाघमारे आदी उपस्थित होते.