कामगार हितसंवर्धक संघटनांची गरज – पुरुषोत्तम सदाफुले


रावबहादुर नारायण मेघाजी लोखंडे यांच्या १२७ वा स्मृतीनिमित्त चर्चासत्र



पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – कामगार हा महत्त्वाचा घटक आहे देशातील आणि महाराष्ट्रातील कामगार संघटनांनी अनेक कायदे टिकवले, कामगार चळवळीचे जनक रावबहादूर नारायण मेघाजी लोखंडे यांनी कामगारांच्या जीवनात अमुलाग्र बदल घडवून आणले जेवणाची सुट्टी, आठवड्याची सुट्टी, तसेच कामाच्या वेळा कमी करून घेतल्या मात्र आता नव्या धोरणानुसार संघटनेचे अस्तित्व धोक्यात आले असून कामगारांचे हक्क मिळवण्यासाठी कामगार हित संवर्धक संघटनांची गरज आहे असे प्रतिपादन कामगार प्रशिक्षक, साहित्यिक पुरुषोत्तम सदाफुले यांनी केले.

कष्टकरी संघर्ष महासंघ महाराष्ट्र, महाराष्ट्र कामगार साहित्य परिषद, बांधकाम कामगार विभाग, महाराष्ट्र फेरीवाला क्रांती महासंघतर्फे कामगार चळवळीचे जनक रावबहादूर नारायण मेघाजी लोखंडे यांच्या स्मृतिदिनानिमित्त ” कामगार चळवळीचे सध्याचे स्वरूप आणि दिशा ” यावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले. यावेळी कामगारांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला .
चर्चासत्र अध्यक्षस्थानी लोकशिक्षक बाबा भारती प्रतिष्ठानचे अध्यक्ष महेंद्र भारती, कसम चे अध्यक्ष काशिनाथ नखाते, लेखक,कामगार नेते अरुण गराडे,गुणवंत कामगार जयवंत भोसले, मनपा समिती सदस्य राजू बिराजदार,किरण साडेकर, किसन भोसले,सलीम डांगे,सचिव तुषार घाटूळे,महिलाध्यक्षा माधुरी जलमुलवार,उपाध्यक्ष राजेश माने, कार्याध्यक्ष इरफान चौधरी,सहदेव होनमाने, फरीद शेख, मनोज यादव, लाला राठोड, ओमप्रकाश मोरया,इंदुबाई वाकचौरे ललिता चव्हाण सिंधुताई जाधव आदी उपस्थित होते.
सदाफुले म्हणाले की महापुरुष आणि कामगार चळवळीतील नेत्यांच्या जयंती व स्मृतिदिनी कामगार हिताचे कार्यक्रम होणे गरजेचे असून ते होत नाहीत , कामगारांना अनेक त्रासातून मुक्ती देण्याचे काम रावबहादूर यांनी केलेले आहे महिलांना १३ तास तर पुरुषांना १८ तास काम करावे लागत होते ते कमी केले तसेच बालमजुरी पण होत होती पण त्यावर ती बंदी सुद्धा त्यांनी घातली तत्कालीन परिस्थितीमध्ये जातीय दंगली होत असताना ब्रिटिश सरकारने लोखंडे यांच्यावर जबाबदारी देऊन त्या दंगली थांबवण्यात आल्या.
अरुण गराडे म्हणाले की युरोपमध्ये १७५० मध्ये औद्योगिक क्रांती सुरू झाली आणि त्यानंतर भारतामध्ये रावबहादूर यांनी कामगारांना दिशा दिली सुरुवातीला कापड गिरणीत काम केले केवळ ४८ वर्षाचे आयुष्य लाभले आणि प्लेगमुळे मृत्यू झाला अन्यथा कामगारांच्या हिताचा अनेक काम पुढे गेले असते.
भारती म्हणाले की कामगारांसाठी झटणारे ठराविकच महापुरुष होऊन गेले त्यामध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा हे उल्लेख करावा लागेल मजूर मंत्री असताना त्यांनी कामगार हिताचे कायदे केले. आता समाजात निरंतर काम करणाऱ्या संघटनांना प्रोत्साहन देण्याची गरज आहे. प्रस्ताविक राजेश माने यांनी केले तर आभार राजू बिराजदार यांनी मानले.








