ताज्या घडामोडीपिंपरी

आंदोलनाला यश ; बांधकाम कामगारांचे लाभ ऑनलाईन कामकाज सुरू

Spread the love

 

कामगारांच्या हक्कासाठी लढा सुरूच राहील – कामगार नेते काशिनाथ नखाते

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – महाराष्ट्र राज्यातील बांधकाम कामगारांचे महामंडळकडून वर्षानुवर्षे कमी जास्त प्रमाणात लाभ मिळत गेला आता मात्र सुमारे पाच महिन्यापासून ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारणे बंद करून हे काम खाजगी ठेकेदाराला सुविधा केंद्र सुरू केल्याने महाराष्ट्र राज्यातील बांधकाम कामगारांचे प्रचंड नुकसान होत होते कष्टकरी संघर्ष महासंघ महाराष्ट्र , कामगार नेते काशिनाथ नखाते यांनी केलेला पत्रव्यवहार तसेच पुणे,मुंबई, आणि नागपूर येथे केलेल्या आंदोलनामुळे बांधकाम कामगारांचे पोर्टल सुरू होऊन त्यांना लाभ मिळण्यास सुरुवात झाली अशी भावना बांधकाम कामगारांनी आज व्यक्त केली.

कष्टकरी संघर्ष महासंघ महाराष्ट्र राज्य तर्फे बांधकाम कामगारांचे ऑनलाइन पोर्टल सुरू होऊन विविध लाभ अर्ज प्रक्रिया सुरू झाल्याबद्दल बांधकाम कामगारांनी एकमेकांना पेढे देऊन समाधान व्यक्त केले.यावेळी प्रदेश उपाध्यक्ष राजेश माने, राज्य संघटक भास्कर राठोड, महीलाध्यक्षा अर्चना कांबळे, रंजना जोगी, अश्विनी कवडे, सोनाली गवळी,अश्विनी कवडे,विलास सपकाळ देवरे,विश्वनाथ गेटले, पोपट खांडेकर,उमेश कुमार आदीसह बांधकाम कामगार उपस्थित होते.

कष्टकरी संघर्ष महासंघ महाराष्ट्र, तसेच महाराष्ट्र राज्यातील बांधकाम कामगार संघटनानी एकत्र येऊन लढा दिला. पुणे जिल्ह्यात दोन इशारा बैठका झाल्या होत्या. राज्यातील बांधकाम कामगारांना साधे व सोपे होईल आणि जेथे शक्य होईल अशा ठिकाणी अर्ज नोंदणी करणे तसेच नूतनीकरण करणे सुविधा यापूर्वी या ऑनलाइन पोर्टलद्वारे खुल्या पद्धतीने होती.मात्र ते पाच महिन्यांपासून बंद करून महाराष्ट्र राज्यातील ३५७ पेक्षा अधिक ठिकाणी खाजगी ठेकेदाराला त्यांच्याकडून अपेक्षित अर्ज प्रक्रिया होतच नव्हत्या कामगारांना आपले काम बुडवून तासन तास ताटकळत राहावे लागत होते हा त्रास कामगार मंत्री आणि सचिवांकडे मांडण्यात आल्या तसेच कामगारांना विविध मिळणाऱ्या योजना ह्या पूर्णतः बंद झाल्याचे आणि राज्य शासनाकडून तसेच बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडून त्यांना सुरक्षा साधने , शिष्यवृत्ती योजना, विवाह अनुदान, प्रसूती अनुदान,गृहप्रकल्प अनुदान, गंभीर आजार उपचार या सर्व योजना बंद असल्याचे आणि बांधकाम कामगार लाभापासून पूर्णतः वंचित असल्याचे निदर्शनास आणून दिले पुणे मुंबई सह नागपूर आंदोलन आंदोलनास यश आले असून आता हे पोर्टल सुरू करण्यात आलेले आहे यावर बांधकाम कामगारांनी समाधान व्यक्त केले आहे.

प्रतिक्रिया

महाराष्ट्र राज्यातील बांधकाम कामगारांचे सुमारे पाच महिन्यापासून कामकाज पूर्णतः ठप्प होते कामगारांसाठी मंडळाकडे मोठा निधी आहे मात्र तो कल्याणासाठी वापरण्यात येत नव्हता यासाठी पुणे,मुंबई,नागपूर येथे केलेल्या आंदोलनास यश आले असले तरी बांधकाम कामगारांचे पुन्हा कागदपत्रे पडताळणीसाठीची प्रक्रिया जाचक आणि वेळ खाऊ आहे हि अट रद्द करण्यासाठी आणि बांधकाम कामगारांना कोणताही लाभ १ महिन्यात मिळण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहोत या लढ्यात सहभागी असलेल्या सर्व बांधकाम कामगारांना जिंदाबाद !
– कामगार नेते काशिनाथ नखाते

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button