माजी उपमहापौर तुषार हिंगे यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांद्वारे मोठ्या उत्साहात साजरा


अभिष्टचिंतन सोहळ्यास दिग्गज राजकीय नेत्यांची उपस्थिती



पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – पिंपरी चिंचवड शहराचे मा.उपमहापौर आणि आरंभ सोशल फाऊंडेशनचे संस्थापक तुषार हिंगे यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांद्वारे मोठ्या उत्साहात पार पडला. हिंगे यांचा अभिष्टचिंतन सोहळा चिंचवड विधानसभेचे आमदार, भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप, खासदार श्रीरंग आप्पा बारणे, आमदार अमित गोरखे, महिला मोर्चा अध्यक्ष सुजाता पालांडे, मा.नगरसेवक अभिषेक बारणे, निलेश बारणे, अनुराधा गोरखे, इरफान सय्यद, बापू काटे, कैलास कुटे, फैजल शेख, केशव घोळवे, युवासेनेचे विश्वजित बारणे, विनायक रासकर आदी सर्वपक्षीय नेते, विविध क्षेत्रातील मान्यवर तसेच तुषार हिंगे मित्र परिवाराच्या सर्व सदस्यांच्या यांच्या उपस्थितीमध्ये मोठ्या उत्साहात पार पडला.

भारतीय जनता पार्टीने आणि जगताप कुटुंबीयांनी सामान्य कुटुंबातील कार्यकर्त्याला दिलेल्या संधीमुळे नगरसेवक, उपमहापौर, क्रीडा सभापती म्हणून काम करू शकलो म्हणत प्रभागातील शाहूनगर, संभाजीनगर, मोरवाडी, दत्तनगर तसेच विद्यानगर येथील नागरिकांनी जे प्रेम आजवर दिल त्यासाठी त्यांचे जाहीर आभार हिंगे यांनी यावेळी मानले व पुढेही असेच प्रेम नागरिकांकडून मिळेल हा विश्वास यावेळी बोलताना व्यक्त केला.
तुषार हिंगे मित्रपरिवाराच्या वतीने सकाळी सद्गुरू शंकर महाराज मठ सातारा रोड येथे अन्नदान करण्यात आहे. यानंतर शहरातील मनपाच्या आकुर्डी येथील रुग्णालयात रुग्णांना फळे वाटप करण्यात आली. मोरवाडी येथील रेणुकादेवी विद्यालयातील लहान विद्यार्थ्यांना शालेय साहित्य आणि खाऊचे वाटप यावेळी करण्यात आले. शहरातील या विविध भागांमध्ये आयोजित कार्यक्रमास, तुषार हिंगे,सौ.सोनाली हिंगे यांनी हजेरी लावली.
सायंकाळी संभाजीनगर रोटरी क्लब मैदान चिंचवड येथे आयोजित अभिष्टचिंतन सोहळ्यास प्रभागातील आणि शहरातील अनेक प्रतिष्ठित नागरिक, सर्व राजकीय नेते,छत्रपती क्रीडासंघमधील सर्व खेळाडू हिंगे यांना शुभेच्छा देण्यासाठी आवर्जून उपस्थित होते. तुषार हिंगे यांनी प्रभागातील जेष्ठानीं तुषार हिंगे यांच्या कार्यपद्धतीचे विशेष कौतुक यावेळी केले. तुषार हिंगे केवळ युवकांचे नव्हे तर जेष्ठ नागरिकांचे देखील हक्काचे नेतृत्व असल्याचे अनेक नागरिकांनी आपल्या शुभेच्छा व्यक्त करताना सांगितले. यावेळी मतदारसंघातील विविध रहिवासी सहकारी सोसायटीमधील जेष्ठ नागरिक संघांना कॅरम बोर्डचे वाटप करण्यात आले. राज्यभरात राबविण्यात आलेल्या रिल्स स्पर्धेला मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादाबद्दल समन्वयक रील्स स्टार आण्णा भंडारी आणि विजेत्यांचा सन्मान यावेळी करण्यात आला. अवधूत गुप्ते यांनी गायलेले ” हक्काचा माणूस आपला” हे निषाद सोनकांबळे लिखित आणि तेजस चव्हाण यांनी संगीतबद्ध केलेलं तुषार हिंगे यांच्यावर आधारित गीत यावेळी प्रदर्शित करण्यात आले.
तुषार हिंगे यांच्या दिवंगत मातोश्रींच्या स्मरणार्थ ६५ देशी फळ झाडे लावण्याचा आणि वाढविण्याचा निर्धार यावेळी आरंभ सोशल फाउंडेशनच्या सर्व सहकार्यांनी केला. हिंगे यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत नागरिकांनी शेकडो पुस्तके यावेळी भेट म्हणून दिली तसेच त्यांच्या वजना इतके शालेय साहित्य देऊन तुला यावेळी करण्यात आला. गड किल्ले संवर्धन जतन कार्य करणाऱ्या “स्वराज्याचे शिलेदार या संस्थेला यावेळी आवश्यक साहित्य वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे निवेदन सुप्रसिद्ध निवेदक अक्षय मोरे यांनी केले.








