लोकनेते लक्ष्मणभाऊ जगताप हे फक्त नाव नसून समाजासाठी प्रेरणादायी अध्याय – चंद्रकांतदादा पाटील


पिंपळे गुरव, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – स्वर्गीय लोकनेते लक्ष्मणभाऊ जगताप हे फक्त नाव नसून समाजासाठी प्रेरणादायी अध्याय आहेत. त्यांनी निष्ठा, सामर्थ्य, आणि सेवाभावाने समाजाच्या विकासासाठी आयुष्य वेचले होते, असे गौरवोद्गार उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी आज (शनिवारी) काढले.



पिंपरी-चिंचवड शहराच्या विकासाची दूरदृष्टी ठेवत लोकनेते लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या स्मृतींना अर्पण करण्यात येणाऱ्या ‘शक्तिस्थळ’ प्रकल्पाचे भूमिपूजन समारंभात ते बोलत होते. त्यावेळी केंद्रीय सहकार व नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, माजी मंत्री आमदार डॉ.तानाजीराव सावंत, मावळ लोकसभा खासदार श्रीरंग बारणे, पुणे महापालिका शिक्षण मंडळाचे माजी उपाध्यक्ष विजयआप्पा रेणुसे, भोसरी विधानसभा आमदार महेशदादा लांडगे, पिंपरी विधानसभा आमदार अण्णा बनसोडे, भोर विधानसभा आमदार शंकर मांडेकर, मावळ विधानसभा आमदार सुनील शेळके, विधान परिषदेचे आमदार अमित गोरखे तसेच कार्यक्रमाचे निमंत्रक माजी आमदार अश्विनी जगताप, आमदार शंकर जगताप, गोसेवक विजूशेठ जगताप तसेच अनेक मान्यवर पदाधिकारी, जगताप परिवाराचे नातेवाईक कार्यकर्ते, लक्ष्मणभाऊंबरोबर काम केलेले सर्व जुने सहकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी प्रकल्पाला शुभेच्छा देत सांगितले की, “शक्तिस्थळ हा प्रकल्प समाजाच्या उन्नतीसाठी एक प्रेरणादायी संदेश ठरेल. हा प्रकल्प पिंपरी-चिंचवड शहराला एक नवीन ओळख मिळवून देईल.”
पिंपरी-चिंचवड शहराच्या विकासाची दूरदृष्टी ठेवत लोकनेते लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या स्मृतींना अर्पण करण्यात येणाऱ्या “शक्तिस्थळ” प्रकल्पाद्वारे निष्ठा, सामर्थ्य, सेवाभाव आणि दातृत्वाचे प्रतीक असलेल्या लक्ष्मणभाऊंच्या स्मृती जपण्याबरोबरच भावी पिढ्यांना प्रेरणा देणे हा उद्देश आहे. या प्रकल्पामध्ये युवकांसाठी अभ्यासिका, सांस्कृतिक प्रदर्शन, आणि प्रेरणादायी स्मृती स्थळ यांचा समावेश असेल. या माध्यमातून समाजसेवेचा संदेश देणारे स्मारक उभारण्याचा संकल्प जगताप परिवार व लक्ष्मणभाऊंच्या मित्रपरिवाराने केला आहे.
भूमिपूजन समारंभात उपस्थित असलेल्या नागरिकांनी लक्ष्मणभाऊंच्या स्मृतींना श्रद्धांजली वाहली. ‘शक्तिस्थळ’ हा केवळ प्रकल्प नसून, समाजातील प्रत्येक घटकाला एकत्र जोडणारा पूल ठरणार आहे. हे स्मारक समाजासाठी उर्जेचे स्थळ आणि प्रेरणेचा स्रोत ठरेल, असा विश्वास सर्व मान्यवरांनी व्यक्त केला.
माजी महापौर माई ढोरे, भाजपा कार्यकारी शहराध्यक्ष शत्रुघ्न बापू काटे, राष्ट्रवादी पक्षाचे नेते विठ्ठल उर्फ नाना काटे, कार्यसिद्धी प्रतिष्ठानचे अध्यक्ष गिरीराज सावंत, माजी नगरसेवक प्रशांत शितोळे, मोरेश्वर भोंडवे, बापू भेगडे, पै.हनुमंत गावडे, संदीप जाधव, उमेश चांदगुडे, हभप पंकज महाराज गावडे, जयदीप खापरे तसेच सर्व माजी नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि लक्ष्मणभाऊंवर नितांत प्रेम करणारे सर्व बंधू-भगिनी आवर्जून उपस्थित होते.








