चिंचवडताज्या घडामोडीपिंपरी

संस्कार प्रतिष्ठानच्या वतीने संस्कार जत्रेचे आयोजन

Spread the love

चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – संस्कार प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य पिंपरी चिंचवड शहराच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांसाठी बुधवार दिनांक ८ जानेवारी २०२५ ते रविवार दिनांक १२ जानेवारी २०२५ रोजी श्री स्वामी विवेकानंद जयंती चे अवचित्य साधून संस्कार जत्रेचे आयोजन केले आहे यामध्ये चित्रकला भगवद्गीता पाठांतर स्पर्धा हस्ताक्षर वकृत्व स्पर्धा समूहगीत वैयक्तिक नृत्य स्पर्धा मॅथ मस्ती समूह नृत्य स्पर्धा रांगोळी स्पर्धा इत्यादींचे आयोजन केले आहे.

या स्पर्धेची सुरुवात प्लास्टिक मुक्त शहर जनजागृती अभियानाने होणार आहे ही स्पर्धा विश्वेश्वर मंदिर शाहू गार्डन जवळ बिजलीनगर चिंचवड पुणे येथे आहे. या स्पर्धेचे उद्घाटन पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त माननीय शेखर सिंह साहेब आणि नवनिर्वाचित आमदार  शंकर  जगताप तसेच आमदार अमित गोरखे यांच्या हस्ते होणार आहे. प्रमुख उपस्थितीमध्ये सामाजिक कार्यकर्ते शेखर चिंचवडे नगरसेवक नामदेव ढाके विश्वेश्वर मंदिर चे सचिव अशोक पाटील टाटा मोटर्स युनियनचे युनियन प्रतिनिधी श्री सुजित साळुंखे श्री उमेश गायकवाड उपस्थित राहणार आहेत.

१२ जानेवारी २०२५ रोजी या कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी श्री स्वामी विवेकानंद राज्यस्तरीय पुरस्कार वितरण व स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ सायंकाळी पाच वाजता होणार आहे.

यावेळी पद्मश्री  गिरीश प्रभुणे, साऊथ सुपरस्टार अभिनेता देव गिल,टाटा मोटरचे जनरल मॅनेजर वीरय्या हिरेमठ,, श्री निंबा भांबरे जनरल मॅनेजर महिंद्रा लॉजिस्टिक चाकण, बाणेर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक  महेश बोळकोटगी,  संतोष साबळे सीनियर मॅनेजर, मारुती सुझुकी वंडर कार,  बाबासाहेब मेमाणे जनसंपर्क अधिकारी तथा राज्य निवेदक  विश्वेश्वर मंदिर बिजलीनगरचे अध्यक्ष  महेश कलाल यांच्या हस्ते होणार आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button