महापालिका कर्मचाऱ्याचा मुलगा झाला सैन्यदलात लेफ्टनंट; आयुक्त शेखर सिंह यांच्या हस्ते नवनियुक्त लेफ्टनंट शिवराज मोरे यांचा सन्मान


पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – अधिकारी आणि कर्मचा-यांचे मुले-मुली शिक्षण,कला,संशोधन,क्रीडा यासारख्या विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करून आपले स्थान निर्माण करीत आहेत,त्यांच्यामुळे शहराच्या नावलौकीकातही भर पडत असून त्यांचा गौरव करताना अभिमान वाटत असल्याचे मत आयुक्त शेखर सिंह यांनी व्यक्त केले.



महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागातील आरेखक संजीवनी प्रदीप मोरे यांचा मुलगा शिवदीप यांची वयाच्या २२ व्या वर्षी सैन्यदलात लेफ्टनंट या पदावर नेमणूक झाली. सैन्यदलात रूजू होण्यापूर्वी शिवदीप यांनी आयुक्त शेखर सिंह यांची भेट घेतली असता त्याच्या सत्कार प्रसंगी आयुक्त सिंह बोलत होते.

यावेळी जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक,आरेखक संजीवनी मोरे, लघुलेखक पळसकर,उपलेखापाल गीता धंगेकर, विजया कांबळे आदी उपस्थित होते.
शिवराज प्रदीप मोरे यांचा जन्म ११ मे २००२ रोजी राशीन, जिल्हा अहमदनगर येथे झाला असुन ते नवी सांगवी येथे वास्तव्य करतात.त्यांचे शालेय शिक्षण केंद्रीय विद्यालय गणेशखिंड औंध,पुणे येथे झालेले आहे.त्यांचे वडील महाराष्ट्र शासन,पुणे मध्ये क्रीडा अधिकारी असल्यामुळे त्यांना अभ्यासाबरोबरच खेळाचे मार्गदर्शनही घरातून मिळाले,शालेय जीवनात लाॅन टेनिस या खेळात शिवराज यांनी सहा वेळा राष्ट्रीय पातळीवर प्राविण्य मिळाले आहे. तर त्यांनी १२ वी नंतर टेक्निकल इन्ट्री स्कीमद्वारे होणारी परिक्षा बंगलोर येथून दिली असून त्यामध्ये, ते पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण झाले आहेत. त्यांनी पुढील प्रशिक्षण बिहार राज्यातील गया येथे ऑफीसर्स ट्रेनिंग अकॅडमी येथून घेतले आहे..
तिथे बेसिक मिलीटरी ट्रेनिंग फेज वन वर्ष पूर्ण केले असून ते फेज टू करिता कॅडेटस ट्रेनिंग विंग करीता सिकंदराबाद येथील मिलीटरी काॅलेजऑफ इलेक्ट्रॉनिक्स अॅण्ड मेकॅनिकल इंजिनियरिंग या संस्थेत दाखल झाले असून त्यांनी इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियरिंग मधून बी टेक पदवी घेतली आहे. शिवराज यांना प्रशिक्षणादरम्यान सुवर्णपदकांसह विविध पुरस्कार मिळालेले असून त्यांना सैन्यप्रमुख उपस्थितीत लेफ्टनंट पदवी मिळालेली आहे.








