राज्यातील महायुती सरकार सावित्रीबाई फुले यांचा आदर्श पुढे नेत आहे – छगन भुजबळ


चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – राज्यातील महायुती सरकार सावित्रीबाई फुले यांचे काम पुढे नेत आहे. लाडकी बहीण योजना, विद्यार्थिनींना शिक्षणासाठी मदत हा त्याचाच भाग आहे, असे मत माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ चिंचवड येथे व्यक्त केले.



चिंचवड येथील महात्मा जोतिबा फुले मंडळाच्या वतीने विविध क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करणाऱ्या महिलांना क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले पुरस्काराने सन्मानित करण्यात आले, यावेळी भुजबळ बोलत होते. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह चिंचवड येथे संपन्न झालेल्या या कार्यक्रमास ओबीसी विकास, दुग्धविकास, अपारंपरिक उर्जा मंत्री अतुल सावे, आमदार शंकर जगताप, रूपाली चाकणकर, महात्मा ज्योतिबा फुले मंडळाचे अध्यक्ष हनमंत माळी, माजी महापौर अनिता फरांदे, अपर्णा डोके, पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे, ज्येष्ठ नेते भाऊसाहेब भोईर, शिवसेना जिल्हाप्रमुख बाळासाहेब वाल्हेकर, राष्ट्रवादीचे नेते निलेश डोके, माजी नगरसेविका माधवी राजापुरे, सुरेश भोईर, वसंत लोंढे, रेखा दर्शीले, संगीता ताम्हाणे, शिक्षण मंडळाचे माजी सभापती चेतन भुजबळ, प्रा कविता अल्हाट, डॉ.नागेश गवळी, मोहन भूमकर आदी मान्यवर उपस्थित होते.

छगन भुजबळ म्हणाले की, आपल्याला जे हवे आहे ते माळी वंजारी म्हणून मिळणार नाही, ओबीसी म्हणूनच मिळेल. मात्र आदिवासी व दलित ज्याप्रमाणे संघटित आहेत त्याप्रमाणे ओबीसी संघटित नाहीत अशी खंत व्यक्त करत असतानाच ओबीसींची मोट बांधण्याचे काम आपल्याला करावे लागेल. इतरांना जे मिळेल ते आम्हाला मिळायला हवे. येथे आम्हीही आहोत आम्ही स्वस्थ बसणार नाही पेटून उठू, मात्र आई सुद्धा रडल्याशिवाय दूध पाजत नाही हे लक्षात घेता सरकारला जागे करावे लागेल.
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कारार्थिंमध्ये रुपाली चाकणकर (अध्यक्षा, महिला आयोग/ विशेष महिला राज्यभूषण), आशाबाई तळेकर (आदर्श माता), मालती भुमकर (आदर्श माता), हभप भाग्यश्री भाग्यवंत (आध्यात्मभुषण), रेश्मा शेख (फातिमा सावित्री पुरस्कार), पुजा डोके (उद्योगभूषण), अनिता टिळेकर (आदर्श मुख्याध्यापिका), मंगल आहेर (आदर्श शिक्षिका), वैशाली खराडे (आदर्श शिक्षिका), पूनम गुजर (समाजभूषण), सुवर्णा कदम (समाजभूषण), पल्लवी मारणे (समाजभूषण), रेश्मा कणसे (समाजभूषण), वंदना आल्हाट (समाज भूषण), संध्या स्वामी (संस्कारभूषण), रेणुका हजारे (साहित्यभूषण), हर्षदा भावसार (कलाभूषण), शुभांगी झोडगे (कार्यक्षम अधिकारी), महानंदा घळगे (श्रमभूषण), निलम चव्हाण (कर्तव्यभूषण), अॅड. जया उभे (कायदाभूषण), संगीता येवला (संगीतभूषण), यांचा समावेश होता.
ओबीसी विकास, दुग्धविकास, अपारंपरिक उर्जा मंत्री अतुल सावे म्हणाले की, महाज्योतीच्या माध्यमातून आम्ही विद्यार्थिनींची यूपीएससीची तयारी करून घेतली. ओबीसींसाठी 56 वसतीग्रहे बांधली. 36 जिल्ह्यात 72 होस्टेल उभारण्यात येणार आहेत. अरण ला अ दर्जा दिला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी अरणला 100 कोटी रुपये दिले. आराखडा तयार झाला असून लवकरच काम सुरू होईल. भिडे वाडा आरण प्रश्न मार्गी लागला आहे. नायगाव येथे सावित्रीबाई स्मारक उभे राहत आहे.
कार्यक्रम आयोजनासाठी हणमंत माळी, सुर्यकांत ताम्हाणे, हभप महादेव महाराज भुजबळ, अनिल साळुंके, प्रशांत डोके, विश्वास राऊत, निलेश डोके, राजेश कर्पे, भरत आल्हाट, संजय जगताप, प्रकाश जमदाडे, नितीन ताजणे, नरहरी शेवते, विजय दर्शले,अमर ताजणे, प्रदीप दर्शले,किशोर माळी, परेश ताम्हाणे, शिवम बर्के,वैजनाथ माळी, रमेश गायकवाड, विलास शेंडे, अपर्णाताई डोके, अनिता ताठे, आशा माळी, उर्मिला भुजबळ, स्मिता माळी, अलका ताम्हाणे, पुजा साळुंके, शकुंतला शेवते, संगीता पाटील, कुंदा यादव, माया बर्के यांनी विशेष परिश्रम घेतले.
स्वागत अपर्णा डोके यांनी प्रास्ताविक अध्यक्ष हणमंत माळी, सुत्रसंचालन महादेव महाराज भुजबळ यांनी केले. तर आभार सुर्यकांत ताम्हाणे यांनी मानले.








