पालखी सोहळ्यात शंकर जगताप यांनी केले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे स्वागत
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – विठू नामाच्या गजरात संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे काल सायंकाळी पंढरपूरकडे प्रस्थान झाले. संत तुकाराम महाराजांच्या 339 वां पालखी सोहळ्यास प्रथमच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निगडी येथे सोहळ्यास उपस्थित राहून पालखीचे दर्शन घेतले. यावेळी, भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी पिंपरी चिंचवड शहरवासीयांच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे राम मंदिराची प्रतिकृती भेट देवून त्यांचे स्वागत केले.
याप्रसंगी, आमदार अश्विनी जगताप, उमा खापरे, प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे, सरचिटणीस नामदेव ढाके, पिंपरी विधानसभा निवडणुक प्रमुख अमित गोरखे, माजी नगरसेवक अभिषेक बारणे, माजी नगरसेविका शर्मिला बाबर, कमल घोलप, तेजस्विनी कदम, राजेंद्र बाबर, बापू बाबर, सचिन काळभोर यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी उपस्थित होते.
संत तुकाराम महाराजांच्या 339 वा पालखी सोहळ्याचे पंढरपूरकडे प्रस्थान झाले. पिंपरी चिंचवड येथे भाजपाच्या वतीने वारकरी व भाविकांचे मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आले. यंदा पालखी रथ सारथ्य करण्याचा मान शहराध्यक्ष शंकर जगताप यांना मिळाला. भक्तिमय वातावरणात निगडी ते आकुर्डी पालखी रथाचे सारथ्य जगताप यांनी केले.
निगडी येथे भाजपतर्फे वारकऱ्यांच्या स्वागतासाठी स्वागत कमान उभारण्यात आली होती. यावेळी, वारकऱ्यांना प्रसादाचे वाटप करण्यात आले.