ताज्या घडामोडीपिंपरीपुणेशिक्षण

यंदा २४, २५ व २६ मे रोजी होणार पेरा सीईटी-२०२४ १९ मे रोजी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस, ३१ मे’ला लागणार निकाल

Spread the love

पुणे,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज)  – प्रीमिनेंट एजुकेशन अँण्ड रिसर्च असोसिएशन (PERA) अर्थात `पेरा` या खासगी विद्यापीठांच्या संघटनेच्या वतीने यंदा दि. २४, २५ व २६ मे २०२४ रोजी `सीईटी` परीक्षा घेण्यात येत आहे. या परीक्षेसाठी अर्ज करण्याचा शेवटचा दिवस १९ मे असून, परीक्षेचा निकाल ३१ मे रोजी घोषित करण्यात येणार आहे, अशी माहिती `पेरा`चे अध्यक्ष व एमआयटी एडीटी विद्यापीठाचे कुलगुरू तथा कार्याध्यक्ष प्रा. डॉ.मंगेश कराड यांनी दिली.
या परीक्षेसंदर्भात माहिती देण्यासाठी एमआयटी आर्ट, डिजाईन व टेक्नालॉजी विद्यापीठ, विश्वराजबाग, पुणे येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत प्रा. डॉ. कराड बोलत होते. याप्रसंगी जीएसपीएम विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.बी.बी. अहुजा, डी.वाय पाटील विद्यापीठ अंबीच्या कुलगुरू डॉ.सायली गणकर, जी.एच.रायसोनी स्किल टेक विद्यापीठाचे कुलगरू डॉ. एम.यू. खरात, प्र.कुलगुरू डॉ.मोहित दुबे, `पेरा`चे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रा. हणमंत पवार, स्ट्रॅटेजिक सल्लागार प्रा. डॉ. सुराज भोयर आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रा. डॉ. कराड पुढे म्हणाले की, राज्यात स्थापित असलेल्या २५ नामांकित खासगी विद्यापीठांमध्ये पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रम, जसे की, इंजीनियरिंग, बायोइंजीनियरिंग, फुड टेक्नोलॉजी, मरीन इंजीनियरिंग, अॅग्रो इंजिनिअरिंग, फार्मसी, फाईन आर्ट्स, डिझाईन, मॅनेजमेंट, विधी (लॉ) आणि आर्किटेक्चर या विषयांसाठी प्रवेश घ्यायचा असेल तर ही परीक्षा देणे अनिवार्य आहे. या परीक्षेच्या आधारावर विद्यार्थ्यांना खासगी विद्यापीठांमध्ये प्रवेश प्राप्त होणार आहे. मागील वर्षीप्रमाणे या वर्षीदेखील `पेरा-सीईटी` कंम्पुटर बेस्ड टेस्ट(सीबीटी) द्वारे घेण्यात येणार आहे. या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांनी दि. १९ मे पर्यंत ऑनलाईन नावनोंदणी करावी.

विद्यार्थ्यांनी अधिक माहितीसाठी www.peraindia.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. गेल्या पाच वर्षांपासून पेराच्या वतीने अशाप्रकारची परीक्षा यशस्वीपणे घेण्यात येत आहे. या माध्यमातून आतापर्यंत राज्यात अडीच लाख विद्यार्थ्यांना विविध विद्यापीठांमध्ये उच्च शिक्षण प्राप्त करून त्यांचे व्यावसायिक करियर पूर्ण करण्याची संधी मिळाली आहे. या वर्षी देखील हजारो विद्यार्थ्यांना राज्यात या माध्यमातून उच्च शिक्षण प्राप्त करून एक उज्ज्वल प्रोफेशनल करियर प्राप्त करण्याची संधी मिळणार आहे.

`पेरा` या संघटनेची स्थापना ही खासगी विद्यापीठांच्या माध्यमातून शैक्षणिक क्षेत्राला एका उंचीवर नेण्यासाठी आणि उच्च शिक्षणात नवनवीन प्रवाह, आधुनिक तंत्रज्ञान, पाठ्यक्रमांमध्ये नावीन्य आणि लवचिकता आणण्यासाठी झाली आहे. या संघटनेची उच्च शिक्षण, संशोधन आणि इतर अभ्यासक्रमेतर आणि सह-अभ्यासक्रम क्रियाकलापांना प्रोत्साहन देणे, उच्च शिक्षणाच्या सर्वांगीण अनुकूल उन्नतीसाठी आणि प्रगतीसाठी मदत करणे यासारखी महत्वाची उद्दिष्ठे आहेत.

`पेरा` अंतर्गत असलेली विद्यापीठे: एमआयटी-एडीटी, एमआयटी-डब्ल्यूपीयू, संजय घोडावत युनिव्हर्सिटी, संदीप युनिव्हर्सिटी, स्पायसर, डी. वाय. पाटील युनिव्हर्सिटी, डी. वाय. पाटील इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी, अजिंक्य डी. वाय. पाटील युनिव्हर्सिटी, एमजीएम युनिव्हर्सिटी, सिंबायोसिस स्किल्स अॅण्ड प्रोफेशनल युनिव्हर्सिटी, सोमैया विद्याविहार युनिव्हर्सिटी, विजयभूमी युनिव्हर्सिटी, विश्वकर्मा युनिव्हर्सिटी, डी. वाय. पाटील अॅग्रीकल्चर अॅण्ड टेक्निकल युनिव्हर्सिटी, श्री बालाजी युनिव्हर्सिटी, फ्लेम युनिव्हर्सिटी, डॉ. पी. ए. ईनामदार युनिव्हर्सिटी, जेएसपीएम युनिव्हर्सिटी, एनआयसीएमएआर युनिव्हर्सिटी, पिंपरी-चिंचवड युनिव्हर्सिटी, डीईएस पुणे विद्यापीठ, एमआयटी विश्वप्रयाग विद्यापीठ, युनिव्हर्सल एआय विद्यापीठ, जी.एच. रायसोनी स्किल टेक विद्यापीठ आणि संजीवनी विद्यापीठ.

“महाराष्ट्र सीईटी परीक्षा आणि जेईई २०२४ सोबत, पेरा ही खाजगी विद्यापीठाची सीईटी परीक्षा आमच्यासाठी तितकीच महत्त्वाची आहे. मला एआय आणि एमएलमध्ये स्पेशलायझेशन सह बीटेकसाठी प्रवेश घ्यायचा आहे. त्यासाठी ‘पेरा’द्वारे जागतिक प्रदर्शनासह दर्जेदार शिक्षण देणाऱ्या काही सर्वोत्तम खाजगी विद्यापीठांच्या प्रवेश प्रक्रियेत भाग घेण्याची संधी या प्रवेश परिक्षेद्वारे मिळणार आहे.”
– दीया देशमुख, इयत्ता 12वी ची विद्यार्थिनी

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button