ताज्या घडामोडीपिंपरी

शरीर आणि मनाचे सौंदर्य टिकवून ठेवण्याचे रहस्य म्हणजे योग-शत्रुघ्न काटे

Spread the love

 

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – आज  आंतरराष्ट्रीय योग दिन ” निमित्त शिवछत्रपती लिनियर अर्बन गार्डन,गोविंद-यशदा चौक,पिंपळे सौदागर येथे योग शिबिराचे आयोजन  शत्रुघ्न (बापू) काटे युथ फाउंडेशन, द आर्ट ऑफ लिविंग,ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालय आणि मीडिया पार्टनर रेडिओ पुणेरी आवाज १०७.८ FM यांच्या संयुक्त विद्यमाने संपन्न झाले .
यावेळी आर्ट ऑफ लिविंगचे सत्यजित भैया यांनी व्यासपीठावरून भजनाच्या ठेक्यावर योगाचे अनेक प्रकार नागरिकाकडून करून घेतले तसेच “योग करण्याची पद्धती व याचे महत्व” उपस्थितांना समजावून सांगितले .
यावेळी ब्रह्माकुमारी संस्थेच्या बी.के.वर्षा दीदी यांनी सांगितले कि “भारत देशात प्राचीन काळी योगाचा जन्म झाला. भारतीय संस्कृतीत योगास खूप महत्त्वाचे स्थान आहे. योगामुळे आपले शरीर व मन निरोगी ठेवले जाते. योगामध्ये अनेक असाध्य रोग बरे करण्याची अद्भुत क्षमता आहे. योग केवळ व्यायाम नाही तर तो शरीर व मन एकत्र जोडण्याचे महत्त्वपूर्ण कार्य करतो तसेच ध्यान साधना करून मनशांतीची प्राप्ती होते.”
या कार्यक्रमादरम्यान योगतज्ज्ञ आणि महिला विषय गंभीर विषयांवर उपाय व जनजागृती करण्यासाठी लिहलेल्या PCOD/PCOS Demystified या पुस्तकाच्या लेखिका कु.विशाखा क्षीरसागर यांनी व्यासपीठावरून नागरिकांना याविषयी सविस्तर माहिती दिली तसेच यावेळी तनिषा मॅडम यांनी झुंबा नृत्य प्रकारच्या माध्यमातून नाविन्यपूर्ण पद्धतीने योग करून घेतले.

यावेळी या योग शिबिरास लहान मुले,स्त्रिया तसेच जेष्ठ नागरिकांनी उत्स्फूर्त पणे सहभाग घेतला.साधारण ५०० नागरिकांनी या योग शिबिरास उपस्थिती नोंदवली तसेच उपस्थित मान्यवरांना तुळसचे रोप देऊन सन्मानित करण्यात आले .
यावेळी सत्यजित भैया चड्डा,बी.के.वर्षा दीदी,उद्योजक वसंत काटे,उद्योजक भरत काटे,लिनियर गार्डन जेष्ठ नागरिक संघ सदस्य, ऑल सिनियर सिटीजन असोसिएशन मेंबर्स, नवचैतन्य हास्य क्लब मेंबर्स, आर.जे तेजस्विनी,आर.जे प्रशांत, गणेश झिंजुर्डे,प्रविण कुंजीर, दिपक गांगुर्डे,समीर देवरे, बाळकृष्ण परघळे,विनोद पाटील, प्रवीण बालन,संभाजी मगर आणि नगरसेवक शत्रुघ्न (बापू) काटे युवा मंचचे सर्व कार्यकर्ते तसेच इतर मान्यवर उपस्थित होते .

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विकास (भोला)काटे यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button