महाराष्ट्राच्या लाडक्या बहिणींला निवडणुक काळामध्ये दिलेले २१०० रुपयांचे आश्वासन पाळा – शिवसेना महिला आघाडीची मागणी


पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – महाराष्ट्राच्या लाडक्या बहिणींला निवडणुक काळामध्ये दिलेले २१०० रुपयांचे आश्वासन पाळा, अशी मागणी शिवसेना महिला आघाडीने पिंपरी-चिंचवड नायब तहसीलदार मनिषा लोंढे यांच्याकडे लेखी निवेदना द्वारे केली आहे.


दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्र विधानसभेच्या धामधूमीत तत्कालीन महायुतीच्या सरकारने निवडणुकीनंतर महायुतीचे सरकार आल्यावर महिलांना लाडकी बहिण योजने अंतर्गत मिळणार्या १५०० रुपये मानधन मिळणाऱ्या महिलांना त्यात वाढ करुन २१०० रुपये देण्याचे आश्वासन दिले होते. त्यांच्या मतदानाच्या आधारावर पुन्हा महायुतीचे सरकार देखील स्थापन झाले परंतु गेले दोन महिन्याचे मानधन देण्यातहि सरकार अपयशी ठरले आहे, २१०० रु. आश्वासन देऊनही काही महिलांच्या फक्त १५०० रुपयेच खात्यात जमा झाले आहे. त्यामुळे महिलांचा अपेक्षाभंग झाला आहे. शिवसेनेच्या महिला संपर्क प्रमुख लतीकी पाष्टे यांच्या मार्गदर्शना नुसार याबाबत आज पिंपरी-चिंचवड नायब तहसीलदार मनिषा लोंढे यांना पिंपरी चिंचवड शहर शिवसेना महिला आघाडीतर्फे लेखी निवेदन देण्यात आले. यासमयी पिंपरी चिंचवड शिवसेना महिला संघटिका अनिता तुतारे, शहर समन्वयक वैभवी घोडके युवतीसेनेच्या जिल्हाधिकारी प्रतिक्षा घुले तसेच महिला पदाधिकारी उपस्थित होते.

महाराष्ट्र शासनाने थकीत व आश्वासना नुसार २१०० रुपये मानधन त्वरित महिलांच्या खात्यात जमा करावे अशी मागणी पिंपरी चिंचवड महिला आघाडीच्या वतीने तहसीलदार यांच्याकडे करण्यात आली .










