चॅलेंजर पब्लिक स्कूलमध्ये जेई लस बाबत जनजागृती


पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – जापनीज इन्सेफेलायटिसला (मेंदूज्वर) प्रतिबंध घालण्यासाठी राज्यातील १ ते १५ वयोगटातील मुलांना लस देण्यात येणार आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाकडून ही प्रतिबंधक लसीकरणाची मोहीम राबविली जाणार आहे. या मोहिमे अंतर्गत पिंपळे सौदागर येथील चॅलेंजर पब्लिक शाळेमध्ये महानगरपालिका अंतर्गत (बुधवारी दि.१२) जेई व्हॅसिनेशन कॅम्पेन राबविण्यात आले.लहान मुलांचे आता मेंदूज्वरापासून संरक्षण होणार आहे.


मेंदूज्वरासारख्या (जेई) गंभीर आजारापासून बचावासाठी लहान मुलांना जेई लस अत्यावश्यक आहे, असे संस्थेचे अध्यक्ष संदीप काटे यांनी सांगितले.

महानगरपालिका वैद्यकीय विभागाच्या वतीने “जे.ई लस” हि शाळेत सर्व मुलांना देण्यात आली .सर्व विद्यार्थ्यांना ही लस मिळावी या संदर्भात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता . या कार्यक्रमात संस्थेचे अध्यक्ष संदीप काटे आणि शाळेच्या प्राचार्य सुविधा महाले यांनी सर्व मुलांना लस मिळावी यासाठी पालकांना विनंती केली.
विद्यार्थ्यांसाठी तसेच शिक्षकांसाठी आरोग्यविषयक कार्यक्रम शाळेत नेहमीच राबविलेले जातात. या कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष संदीप काटे तसेच प्राचार्य सुविधा महाले यांच्या नेतृत्वाखाली हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला.










