स्वराज्यरक्षक , धर्मवीर छ.संभाजीराजेंच्या बलिदानाने पिंपळे सौदागरवासीयांचे डोळे पाणावले
जागतिक महिला दिनानिमित्त उन्नती सोशल फाऊंडेशनतर्फे "छावा" चित्रपटाचा प्रीमिअर शो


जागतिक महिला दिनानिमित्त कर्तुत्वान महिलांचा देखील सन्मान


पिंपळे सौदागर, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड शहरातील विविध सामाजिक कामांसाठी प्रसिद्ध असलेल्या , उन्नती सोशल फाऊंडेशन आणि पी.के.इंटरनॅशनल स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने स्वराज्यरक्षक , धर्मवीर छ.संभाजी महाराज यांच्या अजोड पराक्रमाची साक्ष देणाऱ्या छावा चित्रपटाचा भव्य प्रीमिअर शो , पी.के.इंटरनॅशनल स्कूल येथे आयोजित करण्यात आला. या प्रीमिअर शो ला पिंपळे सौदागर आणि रहाटणी परिसरातील नागरिक बंधू-भगिनी , अबालवृद्ध , तरुण-तरूणी यांनी उदंड प्रतिसाद दिला. छ.संभाजी महाराजांचा क्रूरकर्मा औरंगजेबाने केलेला ‘मृत्यूलाही देखील भय वाटेल असा केलेला छळ’ पाहताना पिंपळे सौदागर वासीयांच्या कडा पणावल्याचे पाहायला मिळाले.

तत्पूर्वी , जागतिक महिला दिनाच्या औचित्याने विविध क्षेत्रात कर्तबगार कामगिरी करणाऱ्या महिलांना उन्नती सोशल फाऊंडेशन तर्फे विशेष सन्मानित करण्यात आले. या सन्मान सोहळ्यात ऍड.हिमानी सूर्यवंशी (घरगुती हिंसाचार विरोधी चळवळ) पोलीस उपनिरीक्षक तेजश्री मैसाले , पी.के.इंटरनॅशनल स्कूलच्या प्राचार्या डॉ.धनश्री सोनवणे , क्रीडा प्रशिक्षक संपदा कुंजीर , प्रजापती ब्राह्मकुमारीज च्या बी.के. दिव्या दीदी , समुपदेशक डॉ.नेहा पंजाबी , फिजिओथेरपिस्ट डॉ. स्नेहल सुरोशे , शोभा फिटनेस सेंटरच्या सर्वेसर्वा आणि नृत्यदिग्दर्शक शोभा पोवार , महिला उद्योजिका सिमरन पंजाबी आणि सफाई कर्मचारी लता गौतम जगताप यांना सन्मानचिन्ह , शाल आणि श्रीफळ प्रदान करून मान्यवरांच्या हस्ते विशेष सन्मानित करण्यात आले.
याप्रसंगी , मनोगत व्यक्त करताना उन्नती सोशल फाऊंडेशनच्या अध्यक्षा डॉ.कुंदाताई भिसे म्हणाल्या , “छत्रपती संभाजीराजे यांनी धर्म, स्वराज्य आणि स्वाभिमान यासाठी आपले संपूर्ण आयुष्य समर्पित केले. छावा चित्रपटाच्या माध्यमातून , स्वराज्य रक्षक आणि धर्मवीर छ.संभाजीराजे यांच्या अतुलनीय धैर्याची आणि बलिदानाची आठवण ठेवून नवचैतन्याने आपल्याला पुढे जायचे आहे. छत्रपती संभाजीराजे हे केवळ एक पराक्रमी योद्धाच नव्हते, तर विद्वान, कुशल शासक आणि एक निडर नेतृत्व होते. त्यांनी धर्म आणि स्वराज्यासाठी दिलेल्या त्यागाला आज संपूर्ण महाराष्ट्र आणि हिंदुस्थान नतमस्तक आहे. जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने आपण विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान महिलांना देखील सन्मानित केले. खरे म्हणजे , आज या ठिकाणी उपस्थित प्रत्येक महिला ही एक प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व आहे, जिने आपल्या मेहनतीने, जिद्दीने आणि आत्मविश्वासाने स्वतःची ओळख निर्माण केली आहे.आपल्या इतिहासाकडे पाहिले, तर आम्हाला अहिल्याबाई होळकर, झाशीची राणी लक्ष्मीबाई, सावित्रीबाई फुले, रमाबाई रानडे यांसारख्या अनेक स्त्रिया दिसतात, ज्यांनी आपल्या कार्याने समाजात अमूल्य योगदान दिले. त्या केवळ कर्तृत्ववान नव्हत्या, तर पुढील पिढ्यांसाठी प्रेरणास्तंभ ठरल्या. आजच्या आधुनिक युगातही महिलांनी विज्ञान, तंत्रज्ञान, व्यवसाय, कला, क्रीडा, शिक्षण आणि समाजसेवा या प्रत्येक क्षेत्रात आपली छाप पाडली आहे. त्यांचे संघर्ष आणि यश पाहून असे वाटते की, “स्त्री ही केवळ गृहिणी नाही, तर ती कुटुंबाचा आणि समाजाचा आधारस्तंभ आहे.”
याप्रसंगी , पी.के.इंटरनॅशनल स्कूलचे संस्थापक श्री.जगन्नाथ आप्पा काटे , उन्नती सोशल फाउंडेशन चे संस्थापक श्री.संजय तात्याबा भिसे, उन्नती सखी मंच उपाध्यक्षा रश्मी मोरे, यांच्यासह , शेखर काटे, विकास काटे,दादा इंदूरे,अतुल पाटील, विशाल वाळके,अजिंक्य भिसे, विठाई वाचनालय चे सभासद, आनंद हास्य क्लबचे सभासद , ऑल सिनियर सिटीजन्स असोसिएशन चे सर्व सभासद तरुण वर्ग आणि पिंपळे सौदागर ग्रामस्थ आणि परिसरातील नागरिक बंधू-भगिनी आदी उपस्थित होते सूत्रसंचालन भामिनी महाले यांनी केले.










