आफ्रो-एशियन विद्यार्थ्यांना पीसीयू चा जागतिक संधी साठी ‘गेट फ्युचर रेडी’ उपक्रम उपयुक्त
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – जागतिक पातळीवर निर्माण होणाऱ्या उद्योग व्यवसायाच्या संधी ‘गेट फ्युचर रेडी’ उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना आत्मसात करण्यास उपयोग होईल. अशा उपक्रमातून विविध देशांतील संस्कृती, परंपरा तसेच शैक्षणिक, औद्योगिक विकास याबाबत उपयुक्त माहिती मिळते. या तंत्रज्ञान व शैक्षणिक स्तरावरील आंतरराष्ट्रीय घडामोडी विद्यार्थ्यांना त्यांचे उज्ज्वल भविष्य घडविण्यासाठी फायदेशीर ठरतील असे पीसीयूच्या प्रभारी कुलगुरू डॉ. मणिमाला पुरी यांनी सांगितले.
पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या (पीसीईटी) आणि साते, मावळ येथील पिंपरी चिंचवड विद्यापीठ (पीसीयू) मध्ये वैश्विक व्यावसायिक विकास उपक्रमांतर्गत आफ्रो – एशियन विद्यार्थ्यांसाठी “गेट फ्युचर रेडी” उपक्रम आयोजित करण्यात आला होता. यामधे अफगाणिस्तान, बांगलादेश, नेपाळ, दक्षिण आफ्रिका, झांबिया, टांझानिया, सूदान, सीरिया, उज्बेकिस्तान, तुर्कमेनिस्तान, झिम्बाब्वे, येमेन, दक्षिण सूदान, गांबिया आणि ओमान येथील विद्यार्थी सहभागी झाले होते.
या उपक्रमात जगातील विविध संस्कृती आणि परंपरा, विचार विद्यार्थ्यांना जाणून घेता आले असे डॉ. मिनाक्षी त्यागी यांनी सांगितले.
पीसीयूचे प्रकुलगुरू डॉ. राजीव भारद्वाज म्हणाले, पीसीयूच्या विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय शैक्षणिक क्षेत्रात होणारे समजून घेता आले. उद्योग, रोजगार संधी बाबत माहिती मिळाली. पीसीयू ने विविध देशांतील विद्यार्थ्यांसाठी तयार केलेले अभ्यासक्रम परिपूर्ण व उज्ज्वल भविष्यात उपयुक्त ठरतील असे सांगितले.
पुणे बिझनेस स्कूलचे प्राचार्य डॉ. गणेश राव, एएएससीआय आणि एएसएआयचे अध्यक्ष वाली रहमान रहमानी, असाईच्या अध्यक्ष संतो ओचन मोडी टोंबे यांनी एआय मधील भविष्यातील संधी, आवश्यकता, बदल, रोजगार निर्मिती, समाज विकासासाठी उपयुक्तता याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्मा भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त पीसीयुचे कुलपती हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.