कामगारांनी महाविकास आघाडीच्या उमेदवारांना विजयी करावे – काशिनाथ नखाते

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार,कामगार विभागाचा कडून प्रचार.
पिंपरी ,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज)- दहा वर्षापासून कामगार हा संकटात सापडला असून सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे कामगारावरती अन्याय होतो आहे उद्योगपती आणि भांडवलदारांचा अजेंडा हे सरकार राबवत असूल कायमस्वरूपी कामगार पद्धत बंद करून निश्चित मुदतीचा रोजगार केल्याने अडचणी निर्माण केल्या म्हणून या सरकारला दूर करण्यासाठी महाविकास आघाडीच्या उमेदवारांना विजयी करा असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस चे कामगार नेते काशिनाथ नखाते यांनी केले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील, कामगार विभागाचे प्रदेशाध्यक्ष शिवाजीराव खटकाळे, यांचे मार्गदर्शनात आणि प्रदेश उपाध्यक्ष सोमनाथ आप्पा शिंदे,राष्ट्रवादी असंघटित कामगार विभागाचे प्रदेशाध्यक्ष काशिनाथ नखाते यांच्या प्रयत्नातून महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ आमोल कोल्हे, संजोग वाघेरे यांना विजयी करावे यासाठी प्रचार करण्यात येतो आहे. सध्या कामगार कायद्यामुळे होणारे परिणाम व कामगारांच्या मागण्या असलेले पत्रक मोठ्या प्रमाणात लोकसभा निवडणुकीच्या उमेदवाराच्या प्रचारारार्थ वाटप करण्यात येत आहेत. पुणे जिल्ह्यातील सर्व एमआयडीसीमध्ये हे पत्रक वाटप करण्यात येत आहेत यामध्ये रांजणगाव, चाकण, तळेगाव, उर्से, भोसरी, मावळ,हडपसर हिंजवडी पिरांगुट याचा समावेश आहे. कामगारांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे सरकारकडून किमान व समान वेतनाची अंमलबजावणी होत नाही ई.एस.आय. व्यवस्था मोडकळीस आली आहे. अशा परिस्थितीमध्ये कामगारांना दिलासा देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष कामगारांचा जाहीरनामा प्रसारित करण्यात येत आहे.
महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ अमोल कोल्हे, संजोग वाघेरे, यांना बहुमताने निवडून देण्यात यावे असे आवाहन करण्यात आले. कामगारांवरती झालेल्या अन्यकारक धोरणामुळे, बदलामुळे कामगार पिचलेला आहे संकटात आहे याला कारणीभूत असलेल्या केंद्र सरकारमधील भाजप सरकारच्या विरोधात मतदान करून महाविकास आघाडीला मतदान करावे असे आवाहन करण्यात आले येत आहे यात राष्ट्रवादी काँग्रेस असंघटित कामगार विभागाचे प्रदेशाध्यक्ष काशिनाथ नखाते, सचिव तुषार घाटूळे, उपाध्यक्ष राजेश माने, निमंत्रक सुरज देशमाने, सलीम डांगे, महादेव गायकवाड, संदेश जाधव, अनिल मोरे,विजय कदम आदी सहभागी होत आहेत.









