ताज्या घडामोडीपिंपरी
शहरातील नालेसफाई व ड्रेनेजची स्वच्छता करा अन्यथा… शिवसेना (उबाठा) गटाकडून तीव्र जल ठिया आंदोलन करण्याचा इशारा
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पहिल्याच पावसात स्मार्ट सिटी असणारे पिंपरी चिंचवड शहर झाले जलमय झाले . शहरातील नालेसफाई व ड्रेनेजची स्वच्छता याची वारंवार मागणी करुन ही महापालिका प्रशासन दुर्लक्ष करत आहे. प्रशासनाने, शासनाने जागे व्हावे. ड्रेनेज व नालेसफाई करून घ्यावी. याबाबत पालिका प्रशासनाने ताबोडतोब उपाययोजना कराव्यात. परिसरातील झोपडपट्ट्यातील भागांमध्ये पुढील येणाऱ्या काळात बचावात्मक कार्यवाही करावी. जर प्रशासनाने याकडे त्वरित लक्ष दिले नाही तर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाकडून तीव्र जल ठिया आंदोलन करण्याचा इशारा शहर प्रमुख ॲड. सचिन भोसले यांनी आयुक्तांना दिला आहे.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, काही ठिकाणी जवळजवळ ६ फुट रस्त्यावरून पाणी वाहत होते. अनेक ठिकाणी फोर व्हीलर,टू व्हीलर पाण्याखाली बुडाल्या, गाड्यांचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. रस्त्याच्या कडेला असणाऱ्या दुकानांमध्ये पाणी शिरले. काही सोसायट्यांमध्ये सीमा भिंती कोसळल्या अनेक गाड्यांचे नुकसान झाले. पिंपरी विधानसभेतील काही क्षेत्रातील अनेक झोपडपट्ट्यामध्ये पावसाचे पाणी घराघरात गेलेले आहे. ड्रेनेजचे पाणी या पावसाच्या पाण्यात मिक्स होऊन ड्रेनेजचे पाणी घराघरात गेल्याची परिस्थिती खास करून दत्तनगर, विद्यानगर, शंकरनगर या भागात झालेली दिसली. ५ वर्ष भाजपची सत्ता असताना त्यानंतर २ वर्ष प्रशासन असताना सुद्धा ना शासनाने ना प्रशासनाने याकडे लक्ष दिले. ना ड्रेनेजची व नाल्यांची साफ सफाई केली.
शहरात महानगरपालिकेच्या माध्यमातून नालेसफाई, स्ट्रॉम वॉटर लाईन सफाई व ड्रेनेज सफाईचे मेंटेनन्स यावर करोडो रुपये खर्च केले जातात. तरी देखील पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांना अतोनात नाहक त्रास सहन करावा लागत आहे. यातून पालिकेने पावसापूर्वी कुठलीच दक्षता घेतली नाही हे दिसून आले आहे. आता पावसाला सुरुवात झाली आहे. तरी पालिकेचे अधिकारी व प्रशासन निद्र्स्थ अवस्थेत आहेत. कालच्या पावसात रस्तेही दिसत नव्हते. सगळीकडेच पाणीच पाणी साठलेले होते जस काही एखादे तळेच असावे. त्यामुळे लोकांची खूप गैरसोय झाली. ट्रफिक जाम झाले. त्यामुळे आता तरी प्रशासनाने, शासनाने जागे व्हावे. ड्रेनेज व नालेसफाई करून घ्यावी, जल ठिया आंदोलन करण्यात येईल.