ताज्या घडामोडीपिंपरीमहाराष्ट्र

सुनेत्रा काकींविरोधात बोलणार नाही, पण…. रोहित पवार

Spread the love

 

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  बारामती लोकसभेत सुनेत्रा काकींविरुद्ध आत्या अशी लढत झालीच. तर आम्ही सुनेत्रा काकींविरोधात बोलणार नाही. कारण त्या आतापर्यंत राजकारणात नव्हत्या. त्यांनी केवळ समाजसेवा केली. त्यामुळं बारामतीत खरी लढत ही सुप्रिया ताई विरुद्ध अजित दादा अशी होणार आहे, म्हणून अजित दादांविरोधात बोलू, असे रोहित पवार म्हणाले.

आंबेगावमध्ये शरद पवार कार्यकर्त्यांन संबोधित करणार आहेत. त्या सभेला रोहित पवारही उपस्थित राहणार आहेत. त्याआधी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी बोलताना त्यांनी अजित पवार यांच्यावर टीकास्त्र सोडलं. त्याशिवाय बारामतीमध्ये काकी विरुद्ध आत्या अशी लढत झाली तर सुनेत्रा काकींविरोधात बोलणार नाही, असेही सांगितलं.

रोहित पवार यांनी पिंपरीतील राष्ट्रवादी काँग्रेसच शरदचंद्र पवार पक्षाच्या जनसंपर्क कार्यालयाला भेट दिली. यावेळी शहराध्यक्ष तुषार कामठे, प्रदेश प्रवक्ते  रविकांत वरपे, माजी  नगरसेविका सुलक्षणा शिलवंत आदी उपस्थित होते.

“मी पुन्हा येईन नंतर आता अमोल कोल्हे यांना पाडणार असं अजित पवार म्हणतात. आता अमोल कोल्हे यांच्याविरोधात पार्थ पवार ही असू शकतात. मात्र अजित दादांना महायुतीत चार जागा मिळतील, पण त्यात शिरूर लोकसभा मिळायची नाही. ” दरम्यान, महायुतीमध्ये सहभागी झाल्यानंतर अजित पवारांनी पुणे जिल्ह्यातील शुरुर आणि बारामती मतदारसंघावर दावा केला होता, तो दावा आजही कायम आहे. पुढील काही दिवसांत महायुतीमध्ये जागावटपाची बैठक पार पडणार आहे. त्यानंतर कुणाला किती जागा याबाबत समोर येईल.

राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार) आमदार रोहित पवार आज आंबेगावमध्ये आले आहेत. त्यावेळी प्रसारमाध्यमांनी त्यांना पार्थ पवारांबद्दल प्रश्न विचारला. त्यावेळी बोलताना रोहित पवार म्हणाले की पार्थ पवार शिरुरमधून निवडणूक लढवू शकता. त्यामुळे पार्थ पवारांच्या चर्चेला पुन्हा एकदा सुरुवात झाली. पार्थ पवार यांनी 2019 च्या लोकसभा निवडणुकीत मावळ मतदारसंघातून आपलं नशीब अजमावलं होतं.

बारामतीमध्ये सुनेत्रा काकींविरोधात बोलणार नाही – रोहित पवार

बारामती लोकसभेत सुनेत्रा काकींविरुद्ध आत्या अशी लढत झालीच तर आम्ही सुनेत्रा काकींविरोधात बोलणार नाही. कारण त्या आत्तापर्यंत राजकारणात नव्हत्या, त्यांनी केवळ समाजसेवा केली. त्यामुळं बारामतीत खरी लढत ही सुप्रिया ताई विरुद्ध अजित दादा अशी लढत होणार आहे, म्हणून अजित दादांविरोधात बोलू, असे रोहित पवार म्हणाले.

अजित पवारांना टोला –
अजित दादा सध्या कुटुंबात एकटे आहेत, असं चित्र आहे. पण ते सध्या ते स्वतःसाठी आणि मलिदा गॅंग साठी बोलतात, असा टोलाही यावेळी रोहित पवार यांनी लगावला. त्याशिवाय युगेंद्र पवार म्हणत असतील ‘शरद पवार साहेब तसं’, म्हणजे याचं स्वागत करायला हवं. आमच्या सारख्या बच्चाला हे कळतंय, साहेबांना साथ देण्याची गरज आहे, असे म्हणत अजित पवारांना टोला लगावला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button