जागतिक महिला दिन विशेष – महिलांच्या हजारो हाताला रोजगार देणाऱ्या मुक्तांगण गृह उद्योगच्या कावेरी संजय जगताप


पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –


स्त्री म्हणजे अडथळ्यांवर मात,
स्त्री म्हणजे क्षणाची साथ
तुझ्या कर्तृत्वाला सर्वांचा सलाम.

मुक्तांगण गृहउद्योग संस्थेच्या कावेरी संजय जगताप यांच्या बाबतीत असेच म्हणावे लागेल. माध्यमातून महिलांसाठी महिला प्रतिष्ठानच्या अध्यक्षा व श्रीगणेशसह. बँकेचे अध्यक्ष संजय गणपतराव जगताप यांच्या सुविद्य पत्नी कावेरी संजय जगताप यांचे सामाजिक कार्य उल्लेखनीय आहे. कावेरी संजय जगताप या पिंपळेगुरवयेथील मुक्तांगण गृहउद्योग महिला प्रतिष्ठानच्या माध्यमातुन प्रतिभा महिलाप्रतिष्ठानच्या माजी आमदार अश्विनी जगताप व आमदार शंकर जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली विविध समाजोपयोगीव्यवसाय मार्गदर्शन शिबीर , बचतगटांची स्थापना, बचतगटाच्या माध्यमातून दिवाळी फराळ बनवुन विक्री केंद्र सुरूकरणे. दिवाळीत सफाई कर्मचाऱ्यांचासन्मान, फराळ वाटप, लसीकरण केंद्रसुरू करून लसीकरणासाठी जनजागृती,महिलादिना निमित्त महिला मेळाव्याचेआयोजन, मतदार नावनोंदणी अभियान,होममिनिस्टर कार्यक्रमाच्या आयोजनातसहभाग, विविध शासकीय दाखलेमिळवून देण्यासाठी मार्गदर्शन, महिलांनाएकवीरा देवी दर्शन घडविले, कोरोनाकाळात कोरोना प्रतिबंधक किटचे वाटप,मोफत मेकअप सेमिनार व सौंदर्य विषयीमार्गदर्शन शिबिर, गणेश जयंती निमित्त हळदी कुंक, कावेरी यांचे पती संजय गणपत जगताप यांनी भंडारा डोंगरा वरीलनियोजित मंदिराच्या बांधकामासाठी एकलाख अकरा हजार एकशे अकरा रुपयांचीदेणगी दिली, पुरग्रस्तांसाठी भरीव मदतकेली. इत्यादी सामाजिक उपक्रम त्यांनीउपक्रम राबवित असतात. आपल्या आजपर्यंत राबविले आहेत.
वेगवेगळ्या माध्यमातून त्यांना स्वतःच्या पायावर उभे राहून त्यांना प्रोतसाहित करण्याचे काम कावेरी जगताप करत आहेत. त्यांचे काम म्हणजे हजारो हाताला काम व कुटुंबाला हातभार मिळत आहे. गृह उद्योगाच्या माध्यमातून महिलांना रोजगार मिळत आहे. या कामातून त्यांच्या कडे पहिले असता एक आत्मिक समाधान देणारे काय त्यांच्या हातून घडत आहे.आपल्या परिसरातील महिलांसाठी काही तरी केले पाहिजे या जाणिवेने आम्ही मुक्तांगणगृहउद्योग महिला प्रतिष्ठानची स्थापना केली. महिलांना स्वंयरोजगार मिळावा यासाठी व्यवसाय मार्गदर्शनपर मेळावे घेण्यात येतात. केवळ गृहिणी म्हणून एका साच्यात न राहता महिलांनीव्यवसायाच्या माध्यमातुन प्रगतीच्या दिशेने आपली यशस्वी वाटचाल करावी.










