सुरक्षितता हाच जीवनाचा सुरक्षित मार्ग – जेष्ठ साहित्यिक सुर्यकांत मुळे


भोसरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – भोसरी येथिल डायनोमर्क कंट्रोल उद्योगांमध्ये 54 व्या राष्ट्रीय सुरक्षा सप्ताहाची सांगता करताना ज्येष्ठ विचारवंत,साहित्यिक सूर्यकांत मुळे यांच्या “सुरक्षितता हाच जीवनाचा सुरक्षित मार्ग” या पुस्तकाचे प्रकाशन कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक किशोर राऊत यांच्या हस्ते करण्यात आले.


त्यावेळी ते म्हणाले की, प्रत्येकाने काम करत असताना आपल्याबरोबरच आपल्या सहकारी कामगाराची पण काम करताना काळजी घेतली पाहिजे, 5 S. ही जापनीज संकल्पना आत्मसात केली पाहिजे आपले कोणीतरी घरी वाट बघत आहे.आई-वडील,पत्नी, मुले याची जाणीव ठेवून सुरक्षित काम करावे ,एखादे काम माहिती नसेल त्या समजल्याशिवाय किंवा माहिती घेतल्याशिवाय ते काम न करण्याचा सल्ला राऊत यांनी दिला.

ज्येष्ठ विचारवंत ,साहित्यक सूर्यकांत मुळे म्हणाले की मी आतापर्यंत दजारो हजार ट्रक ड्रायव्हर, व कामगारांना,तसेच शालेय विद्यार्थ्यांना सुरक्षिततेचे प्रशिक्षण दिले आहे प्रत्येकाने आपल्या खिशात आपले ओळखपत्र जवळ असणे क्रमप्राप्त आहे जेणेकरून कुठेही अपघात झाल्यास इतर जवळ असलेले नागरिक आपल्या नातेवाईकांशी संपर्क करतील.
कंपनीचे सीईओ प्रकाश अभ्यंकर म्हणाले की प्रत्येक कामगारांने पुस्तक वाचून त्यामध्ये लिहिलेले सुरक्षिततेचे नियम व घ्यावयाची काळजी व उपाय योजना याचे आत्मसात करावे.
गुणवंत कामगार अण्णा जोगदंड म्हणाले की, काम करत असताना मोबाईलचा अति वापर करू नये सध्या तरुण पिढी मोबाईलच्या विळख्यात सापडली आहे असे जोगदंड म्हणाले.प्रत्येकाने आपल्या मोबाईलला पासवर्ड ठेवला आहे ,त्यामुळे दुर्घटनेच्या वेळी संपर्क करता येत नाही. अशावेळी दोन जवळच्या व्यक्तीचा मोबाईल नंबर इमर्जन्सी म्हणून मोबाईलच्या स्क्रीनवर ठेवावा असा सल्ला त्यांनी दिला.
सुरक्षित सप्ताह दिनानिमित्त सुरक्षेतेचे विषयी माहिती व सुविचार याची स्पर्धा घेतली होती तिन्ही क्रमांक आलेल्या कामगारांना प्रमाणपत्र,रोख रक्कम त्यावेळी विभागप्रमुख त्यांच्या हस्ते देऊन सन्मानित करण्यात आले.
यावेळी कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक किशोर किशोर राऊत ,सीईओ प्रकाश अभ्यंकर,मनुष्यबळ प्रमुख तथा लेखक सूर्यकांत मुळे, गुणवंत कामगार अण्णा जोगदंड, विभाग प्रमुख दिलीप इधाते, ज्ञानेश्वर क़ोतवाल ,पाडुरंग इटकर,प्रवीण बाराथे ,जयंत राऊत,दशरथ कांबळे, वर्कशॉप व्यवस्थापक विनायक शेरकर,शांताराम पाटील इत्यादी अधिकारी उपस्थित होते .
पुस्तक प्रकाशनाच्या संयोजनात व बक्षीस वितरण कार्यक्रमात सचिन सदाफुले, पंडित वनस्कर , पांडुरंग नाडे,आनिल नाडे, यांनी सक्रिय सहभाग नोंदवला.










