ताज्या घडामोडीपिंपरी

समृद्धी भोईर हिची राष्ट्रीय युथ ॲथलेटिक्स स्पर्धेसाठी निवड

Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज)- पिंपरी चिंचवड शहरातील समृद्धी हिरालाल भोईर हिची “नॅशनल गेम्स पटना बिहार २०२५” हॅपटेथलोन इव्हेंटसाठी होणाऱ्या राष्ट्रीय युथ ॲथलेटिक्स स्पर्धेसाठी निवड झालेली आहे.

राष्ट्रीय प्रशिक्षक चंद्रशेखर कुदळे यांनी समृद्धी भोईर हिला प्रशिक्षण दिले आहे. शहरातील साई स्पोर्ट्स अकॅडमी संस्थेत ती प्रशिक्षण घेत आहे. गेली ६ वर्षे ती सातत्याने सराव करित आहे. नॅशनल गेम्ससाठी निवड होण्यापूर्वी तिने राज्य स्पर्धा गाजवलेल्या‌ आहेत. समृद्धी ही डी. वाय. पाटील महाविद्यालयात अकरावी इयत्तेत शिकत आहे. तिने या स्पर्धेसाठी सर्व प्रशिक्षण आणि सराव संत ज्ञानेश्वर क्रीडा संकुल इंद्रायणी नगर भोसरी येथे केलेला आहे. या स्पर्धेत समृद्धी हिने महाराष्ट्र राज्यासाठी पदक मिळवावे अशी पिंपरी चिंचवड वासियांची अपेक्षा आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button