महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १३३ वी जयंती साजरी


पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – आज देशभरात महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १३३ वी जयंती मोठ्या जल्लोषात साजरी केली जातीय


पिंपरी चिंचवड शहरातील स्पर्धा परीक्षा देणाऱ्या दोनशेहून अधिक विद्यार्थ्यांनी , सलग अठरा तास अभ्यास करण्याचा उपक्रम राबविलाय.
शिकल्या शिवाय संघटित होता येत नाही आणि संघटित झाल्या शिवाय संघर्ष करता येत नाही या बाबासाहेबांच्या विचारांनी प्रेरित होऊन आपण,नाचून नाही तर वाचून डॉक्टर बाबासाहेबांची जयंती साजरी करत असल्याचं विद्यार्थ्यांनी म्हंटलय.

तर प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेणारे हे विद्यार्थी आरक्षणाचा विचार न करता अभ्यास करत स्वतला सिद्ध करतायत ही कौतुकाची बाब असल्याचं सांगत राष्ट्रवादीचे आमदार अण्णा बनसोडे यांनी उपक्रमात सहभागी होणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा पुस्तकांचा संच भेट देत त्यांचं मनोबल वाढवलं आमदार बनसोडे यांच्या मार्फत मागील १९ वर्षांपासून राबविल्या जात असलेल्या या उपक्रमाचं सर्व स्तरातून स्वागत केलं जातय.










