ताज्या घडामोडीपिंपरी

रविवारी पिंपरीत सामाजिक सलोखा आरक्षण परिषद

Spread the love

 

पिंपरी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – महाराष्ट्रात सध्य परिस्थितीत विविध समाजाच्या वतीने आरक्षणाची मागणी करण्यात येत आहे. वेगवेगळ्या समाज प्रतिनिधींमुळे व्यक्त होणाऱ्या प्रतिक्रियांमुळे जाती जातीत दुरावा निर्माण होत आहे. पुरोगामी विचारांचा वारसा असलेल्या महाराष्ट्र राज्याचा सर्वांगीण विकास होण्यासाठी आणि एक प्रगत राज्य म्हणून पुढे येण्यासाठी सामाजिक सलोखा निर्माण करणे आवश्यक आहे. शिव, फुले, शाहू, आंबेडकर यांच्या विचारांचा आणि संविधानाचा आदर करीत आरक्षण मिळवणे हा सर्वांचा हक्क आहे. यासाठी सामाजिक जनजागृती आणि सामाजिक सलोखा निर्माण करणे ही सर्व सामाजिक प्रतिनिधी व कार्यकर्त्यांची जबाबदारी आहे. यासाठी संविधान प्रेमी संघटना, पिंपरी चिंचवडच्या वतीने सामाजिक सलोखा आरक्षण परिषदेचे रविवारी आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती निमंत्रक प्रकाश जाधव यांनी प्रसिद्धीस दिली आहे.

पिंपरी, संत तुकाराम नगर येथील आचार्य अत्रे रंगमंदिर येथे रविवारी (दि.२४) दुपारी चार वाजता होणाऱ्या या परिषदेचे उद्धाटन संविधान अभ्यासक प्रा. सुभाष वारे यांच्या हस्ते होणार आहे. ज्येष्ठ मार्गदर्शक मानव कांबळे अध्यक्ष स्थान भूषविणार आहेत. यावेळी ओबीसी आरक्षण अभ्यासक ॲड. मंगेश ससाणे, मराठा आरक्षण मार्गदर्शक प्रवीण दादा गायकवाड, मराठा आरक्षण भूमिका मांडणारे डॉ. शिवानंद भानुसे, मराठा आरक्षण अभ्यासक राजेंद्र कोंढरे, मुस्लिम आरक्षण भूमिका सांगणारे अंजुम इनामदार, ओबीसी आरक्षण समितीचे प्रताप गुरव, अनुसूचित जाती आरक्षण अभ्यासक प्रा. धनंजय भिसे, धनगर आरक्षण भूमिका मांडणारे अजित चौगुले, मातंग समाजाचे प्रतिनिधी सतीश कसबे, एस. टी. समाज प्रतिनिधी विष्णू तथा अण्णाभाऊ शेळके आदी वक्ते यावेळी मार्गदर्शन करणार आहेत.

या सामाजिक सलोखा आरक्षण परिषदेस सर्व संविधान प्रेमी, पुरोगामी विचारांचा पुरस्कार करणाऱ्या नागरिकांनी, सामाजिक संस्था, संघटनांच्या प्रतिनिधींनी उपस्थित रहावे असे आवाहन निमंत्रक प्रकाश जाधव यांनी केले आहे.

या परिषदेच्या आयोजनात मारूती भापकर, आनंदा कुदळे, सतिश काळे, विशाल जाधव, प्रविण कदम, राजन नायर, देवेंद्र तायडे, पांडुरंग परचंडराव, गुलामभाई शेख, दिलीप गावडे, प्रकाश बाबर, मोहन जगताप, सुनिता शिंदे, मीरा कदम, वैभव जाधव, नंदकुमार कांबळे, शिवशंकर उबाळे, काशिनाथ नखाते, शांताराम खुडे, प्रदीप पवार आदींनी सहभाग घेतला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button