विद्यानिकेतन इंग्लिश मिडीयम स्कूल चा राज्यस्तरीय रोलर हॉकी स्पर्धेत विरार येथे सलग सात वर्ष विजय कायम ठेवून या वर्षीही द्वितीय क्रमांक
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – क्रिडा व युवक सेवा संचालनालय, (महाराष्ट्र राज्य) पुणे जिल्हा क्रिडा परिषद व जिल्हा क्रिडा अधिकारी कार्यालय, पालघर द्वारा आयोजित राज्य स्तरीय रोलर हॉकी क्रिडा स्पर्धा (२०ऑक्टो ते २१ऑक्टो २०२४) विरार मध्ये पार पडल्या. वयोगट १९ वर्षाखालील मुले मध्ये टाटा मोटर्स विद्यानिकेतन इंग्लिश मिडीयम स्कूल ने द्वितीय क्रमांक पटकावला.
या स्पर्धेसाठी पात्र होण्यासाठी अवघड निकष आहेत. प्रथम जिल्हास्तरीय स्पर्धा मधील विजेता संघ हा विभागीय स्पर्धेसाठी पात्र होतो. पुणे विभागात – पुणे शहर, पिंपरी चिंचवड, पुणे ग्रामीण, नगर शहर, नगर ग्रामीण, रायगड, सोलापुर शहर, सोलापुर ग्रामीण या सर्वांचा समावेश आहे. विभागीय स्पर्धेतील विजेता संघच फक्त राज्यस्तरीय स्पर्धे साठी पात्र ठरतो. हा सामना खेळण्यासाठी पुणे, नाशिक, औरंगाबाद, लातूर, कोल्हापूर, नागपूर, अमरावती, मुंबई असे एकूण ८ विभागांपैकी ६ विभागाचे संघ स्पर्धेत उतरले होते. उपांत्य पूर्व सामना अमरावती विरुद्ध ६-० असा सहज जिंकल्या नंतर, उपांत्य सामना कोल्हापुर संघा विरुद्ध पेनल्टी शुट आऊट च्या माध्यमाने जिंकला व पुणे विभाग (विद्यानिकेतन स्कूल) ने अंतिम सामन्यात प्रवेश केला.
अतिशय अटीतटीच्या या अंतिम सामन्यात मुंबई विभागाने २-१ ने विजय मिळवला.
विद्यानिकेतन स्कूल तर्फे खेळतांना मयंक खैरनार, श्रेयस विनोद, वेदांत दाभाडे, यांनी गोल नोंदविले व गोलकिपर रुद्र चव्हाण यांनी चमकदार कामगिरी केली, अर्थव फेगडे, नैतिक आटोळे, हिमांशु पल्हाडे, श्रीजी महेश, आदित्यराज घोलप, प्रथम देशमुख यांनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले. या स्पर्धे साठी विद्यानिकेतन क्रिडा संचालक शैलेंद्र पोतनीस , व क्रिडा प्रशिक्षक अमित थोरात यांचे बहुमल्य मार्गदर्शन सर्व खेळाडूंना लाभले. विद्यानिकेतन स्कूल च्या प्राचार्या सौ दिपीका गवस यांचे सर्वतोपरी सहकार्य लाभले.