ताज्या घडामोडीपिंपरीशिरूर

कोल्हे हे तर महागद्दार -दिलीप मोहीते पाटलांचा कोल्हेंवर हल्लाबोल

Spread the love

खेड तालुक्यात आढळऱाव पाटील यांच्या प्रचारदौऱ्याला प्रचंड प्रतिसाद

चिखलगाव,डेहणे,आंबोलीत भर उन्हातही उत्स्फुर्त स्वागत

राजगुरुनगर, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – हा गद्दार तो गद्दार म्हणणारे कोल्हे स्वत महागद्दार असल्याचे सांगत कोल्हे यांच्यावर आमदार दिलीपराव मोहीते पाटल यांनी कोरडे ओढले. तर कृषी मंत्री असताना शरद पवार यांनी जर शेतकऱ्यांच्या हिताचे कायदे केले असते तर कांदा आणि दुधाचा प्रश्न कधीच मार्गी लागला असता,अशी टीका शरद पवार यांच्यावर केली.

खेड तालुका विधानसभा मतदारसंघातील विविध गावांमध्ये महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रचारार्थ आयोजित दौऱ्याला ग्रामस्थांकडून प्रचंड प्रतिसाद मिळाला,गावातून मोठी रॅली,काही ठिकाणी जेसीबीतून फुलांची उधळण तर,कोपरा सभेला मोठी गर्दी असे चित्र पहायला मिळाले. चिखलगाव,डेहणे,आंबोली सह विविध गावांमध्ये हा दौरा झाला. खेडचे आमदार दिलीप मोहीते यांच्या नेतृत्वात महायुतीच्या सर्व घटकपक्षांच्या पदाधिकारी, कार्यकर्ते, सरपंच तंटामुक्तीचे अध्यक्ष, विविध पक्षांच्या विविध सेलचे पदाधिकारी यांचा मोठा सहभाग या दौऱ्यात दिसून आला.

खेड तालुका विधानसभा मतदारसंघातील विविध गावांमध्ये महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रचारार्थ आयोजित दौऱ्याला ग्रामस्थांकडून प्रचंड प्रतिसाद मिळाला, गावातून मोठी रॅली, काही ठिकाणी जेसीबीतून फुलांची उधळण तर, कोपरा सभेला मोठी गर्दी असे चित्र पहायला मिळत होते.चिखलगाव,डेहणे,आंबोली सह विविध गावांमध्ये हा दौरा झाला. खेडचे आमदार दिलीप मोहीते यांच्या नेतृत्वात महायुतीच्या सर्व घटकपक्षांचे पदाधिकारी ,कार्यकर्ते ,सरपंच ,तंटामुक्तीचे अध्यक्ष, विविध पक्षांच्या विविध सेलचे पदाधिकारी यांचा मोठा सहभाग या दौऱ्यात दिसून आला.

आढळराव म्हणाले की, खेड तालुक्यातील अनेक गावांतून विकासकामे मार्गी लावली आहेत.यापूढेही माझी जबाबदारी राहील,महायुतीच्या हातात सत्तेच्या चाव्या आल्या तरच आपला विकास खऱ्या अर्थाने होणार असल्याने महायुतीचा उमेदवार म्हणून माझ्या पाठीशी आपण रहा असे आवाहन त्यांनी केले.

शिवसेना जिल्हाप्रमुख भगवान पोखरकर, भाजपच्या सहकार आघाडीचे जिल्हाध्यक्ष शेखर शेटे,खेड तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष कैलास सांडभोर, भाजपचे तालुका अध्यक्ष शांताराम भोसले,जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा निर्मलाताई पानसरे, कात्रज दूध उत्पादक संघाचे संचालक अरुण चांभारे, राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या महिला अध्यक्षा संध्याताई जाधव, पंचायत समितीच्या माजी सभापती सुजाताताई पचपिंड,माजी जिल्हा परिषद सदस्य अरुण गिरे,बाजार समितीचे सभापती कैलास लिंभोरे, बाजार समिती संचालक हनुमंत कड, राष्ट्रवादी कॉंग्रसचे शहराध्यक्ष सुभाष होले, माजी सभापती विलास कातोरे, नवनाथ ढोले, कात्रज डेअरीच्या संचालक लताताई गोपाळे, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालिका नंदाताई कड,राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पश्चिम विभागाचे अध्यक्ष नामदेव गोपाळे, महिला भाजपच्या महिला मोर्चा अध्यक्ष कल्पना गवारी, तालुका सरचिटणीस अक्षय प-हाड, संपर्क प्रमुख भगवान मेदनकर, कार्याध्यक्षा प्रितम शिंदे, विद्यार्थी आघाडी तालुका अध्यक्ष रवींद्र वाडेकर, युवा मोर्चा अध्यक्ष संदेश जाधव, सहकार आघाडी अध्यक्ष अनिल सोनवणे, चिटणीस निखिल सांडभोर, शहर उपाध्यक्ष निर्मला कवडे,अमिना पावसे,युवा मोर्चा सरचिटणीस नसीम पठाण, वाहतुक आघाडीचे योगेश देशमुख,राष्ट्रवादी कॉंग्रेसचे युवक अध्यक्ष जयसिंग दरेकर, विद्यार्थी अध्यक्ष सिद्धार्थ कांबळे, शहराध्यक्ष युवक सागर सातकर, विभाग शहर अध्यक्ष पप्पु बनसोडे, युवक शहर अध्यक्ष सौरभ गव्हाणे, सरचिटणीस उल्हास कुडेकर,चिखलगावचे माजी सरपंच दत्तात्रय सुर्यवंशी आदी यावेळी उपस्थित होते.

चौकट…
कोल्हेंनी दादांची कामे चोरली..?
आढळराव पाटील यांनी रस्ते,महामार्ग,बैलगाडा शर्यतीच्या परवानगी साठी तसेच अन्य प्रकारच्या केलेली कामे कोल्हे यांनी त्यांच्या कार्यअहवालात दाखवली आहेत.एक प्रकारे दादांच्या कामांचे श्रेय लुटणे म्हणजे एक प्रकारची चोरीच नाही का..
-दिलीप मोहीते पाटील (आमदार,खेड विधानसभा )

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button