वसूबारस निमित्त महिलांना गोमातेची पुजा करता यावी यासाठी दिनेश यादव यांचा आदर्श उपक्रम
चिखली, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – दिपावलीचा पहिला सण वसुबारस निमित्त गोमाता पूजन कुदळवाडी या ठिकाणी आयोजित करण्यात आले होते. प्रभागामधील अनेक महिलांनी गोमातेचे पूजन केले. कुदळवाडी परिसरातील महिलाना गोमातेची पुजा करता यावी या साठी स्वी सदस्य दिनेश यादव यांनी गोमाता कुदळवाडी श्री विठ्ठल मंदिर चौकात पुजनाची व्यवस्था करण्यात आली होती.
परिसरातील अनेक महिलानी गोमातेची पुजा करून नैवेद्य दाखवून दर्शन घेतले यावेळी अनेक नागरिक उपस्थित होते.
कोरोना संकटात संपूर्ण देशभरात दिवाळी आनंदाने पण साधेपणाने साजरी केली जाणार आहे. सगळीकडे दिवाळीची तयारी सुरु आहे. गोवत्स द्वादशी म्हणजेच, वसुबारस. आश्विन कृष्ण द्वादशीस वसुबारस साजरी केले जाते.
…यासाठी केली जाते गाय-वासराची पुजा!
गोवत्सद्वादशी म्हणजे गाई-गुरांबददल कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस. वसु म्हणजे द्रव्य अर्थात धन त्यासाठी असलेली बारस म्हणजेच, द्वादशी म्हणून या दिवसाला गोवत्स द्वादशी असे म्हणतात. भारतीय संस्कृतीत गायीला मातेचा दर्जा देण्यात आला असून, ती पूजनीय मानली गेली आहे. तिच्याप्रति कृतज्ञतेतून वसुबारस या दिवशी गाय आणि तिचे वासरू यांची पूजा केली जाते. आश्विन वद्य द्वादशी, या तिथीला वसुबारस किंवा गोवत्स द्वादशी असे म्हणतात. समुद्रमंथनातून पाच कामधेनू उत्पन्न झाल्या, अशी कथा आहे. त्यातल्या नंदा नावाच्या धेनूला उद्देशून वसुबारस हे व्रत करण्यात येतं. या दिवशी सौभाग्यवती स्त्रिया सकाळी अथवा सायंकाळी सवत्स गायीची पूजा करतात.