ताज्या घडामोडीपिंपरी

डॉ.कैलास कदम यांची इंटकच्या प्रदेशाध्यक्षपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल जाहीर नागरी सत्कार

Spread the love

 

पिंपरी चिंचवड शहर (जिल्हा) काँग्रेस कमिटी अध्यक्ष डॉ. कैलास कदम यांची राष्ट्रीय मजदुर कॉंग्रेस (इंटक) महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष पदी डॉ. कैलास कदम यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल हिंद कामगार संघटना (इंटक) व पुणे जिल्हातील इंटक संलग्न सर्व कामगार संघटना, कामगार, पिंपरी चिंचवड शहरातील नागरिक यांच्या वतीने जाहीर नागरी सत्कार करण्यात आला.

हिंद कामगार संघटना कार्यालय,खराळवाडी, पिंपरी येथे संत तुकाराम महाराज यांचे वंशज व देहू संस्थान अध्यक्ष श्री पुरुषोत्तम महाराज मोरे यांच्या हस्ते तसेच पद्मश्री सुभेदार मुरलीकांत पेटकर यांच्या अध्यक्षतेखाली व हिंदू धर्मगुरू ब्रवाहन वाघ, मुस्लिम धर्मगुरू मौलाना अब्दुल गफार अशरफी, ख्रिश्चन धर्मगुरू सुधीर पारकर, शिख धर्मगुरू ग्यानीजी रविंदर सिंग, बौद्ध धर्मगुरू भन्ते राहुल बोधि या धर्मगुरुच्या आशीर्वादाने डॉ. कैलास कदम यांचा सत्कार करण्यात आला.
महाराष्ट्र इंटक प्रदेश अध्यक्ष पद डॉ.कैलास कदम यांच्या स्वरूपात पहिल्यांदाच पुणे जिल्ह्याला मिळालेले आहे. त्यानिमित्ताने जाहीर नागरी सत्कार आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात आला, या सोहळ्यात कोणताही राजकीय रंग नव्हता. यावेळी ज्येष्ठ कायदेतज्ञ ॲड. जयप्रकाश पवार, चंद्रकांत सातकर, महेश ढमढेरे, संभाजी राक्षे, मुंबई इंटक चे अध्यक्ष दिवाकर दळवी, महाराष्ट्र एस. टी. वर्क्स कॉंग्रेस (इंटक) सरचिटणीस मुकेश तिगोटे, पुणे इंटक सरचिटणीस मनोहर गडेकर, अम्युनिशन फॅक्टरीचे शशिकांत धुमाळ, पीएमपीएमएलचे राजेंद्र खराडे, पुणे विद्यापीठाचे रघुनाथ वाव्हळ, बँक कर्मचारी संघाचे सुनील देसाई, कोकण अठरागाव चे अध्यक्ष अशोक कदम, ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष आनंदराव फडतरे, राम कड, चंद्रशेखर हौन्शाळ, कोकण युवा शक्तीचे रुपेश मोरे आदिंसह सर्वं सामान्य कामगार, असंघटित कामगार, कष्टकरी, उपेक्षितांचा कामगार नेता म्हणून त्यांना सर्व थरांतील नागरिकांनी शुभेच्छा व आशीर्वाद दिले. तसेच बहुसंख्येने कामगार प्रतिनिधी, कामगार, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवर, नागरिक उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button