“आम्ही सारे, संजोग वाघेरे” म्हणूनच मतदारांपर्यंत पोहोचू; कर्जत येथील शिवसैनिकांचा संकल्प
– शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची आढावा बैठक
– उद्धव ठाकरे साहेबांचा संदेश घरोघरी पोहोचविण्याची घेतली जबाबदारी
कर्जत, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कर्जत येथील सर्व प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्त्यांची आढावा बैठक पक्षाचे मावळ लोकसभा संघटक आणि उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांच्या उपस्थितीत पार पडली. या बैठकीत मतदारसंघातील महत्वाच्या मुद्द्यावर चर्चा करण्यात आली. तसेच उद्धव ठाकरे साहेबांचा संदेश घरोघरी पोहोचविण्याची जबाबदारी आमची असून “आम्ही सारे, संजोग वाघेरे” म्हणूनच मतदारांपर्यंत पोहोचू, असा संकल्प उपस्थित शिवसैनिकांनी केला.
खोपोलीतील शहर शिवसेना जनसंपर्क कार्यालयात झालेल्या या बैठकीला शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या महिला संघटिका सुवर्णा जोशी, उपजिल्हा प्रमुख नितीन सावंत, खालापूर तालुकाप्रमुख पिगळे, उत्तम कोळंबे, तालुका संघटक बाबू घारे, तालुका सांघटिका करुणा बडेकर, संपर्कप्रमुख सुमनताई लोगले, उपतालुका संघटिका संगीताताई खाडे, विधानसभा युवा अधिकारी संपत हडप, तालुका अधिकारी प्रथमेश मोरे, माजी सभापती पंढरी राऊत, कर्जतचे माजी सभापती प्रदीप ठाकरे, उपतालुका प्रमुख प्रमोद सुर्वे, बाजीराव दळवी, नितीन घुळे, सुरेश गोमारे, शहरप्रमुख निलेश घरत, खालापुरचे ज्येष्ठ नेते उत्तम भोईर, ज्येष्ठ शिवैनिक मदन ओसवाल, अनिल पिंगळे यांच्यासह शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षातील तसेच, महाविकास आघाडीतील विविध पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या बैठकीत मतदारसंघातील महत्वाच्या मुद्द्यावर चर्चा करण्यात आली. “आम्ही सारे, संजोग वाघेरे” म्हणूनच मतदारांपर्यंत पोहोचू, असा संकल्प उपस्थित शिवसैनिकांनी केला. शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाची मशाल सर्वापर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी घेतली आहे. तसंच उध्दव ठाकरे साहेबांनी दिलेला संदेश घरोघरी कसा पोहोचेल, यासाठी आम्ही प्रयत्नशील असल्याचे आश्वासन यावेळी उपस्थित सर्वांनीच दिले.
संजोग वाघेरे पाटील म्हणाले की, पिंपरी चिंचवडच्या राजकारणात मागील अनेक वर्षे योगदान देत असताना लोकांच्या अपेक्षांवर खरे उतरण्याचे काम केले. राज्याच्या राजकारणात शिवसेना पक्ष आणि उध्दव ठाकरे साहेबांना संकटात आणण्याचे काम केले गेले. सर्व बाजूंनी त्यांना घेरण्य़ाचे काम सुरू आहे. पण नेटाने या सगळ्या संकटाचा सामना ते करत आहेत. त्यांना साथ देणे ही आपली सर्वाची जबाबदारी आहे. त्यांच्यासोबत येऊन लढण्याची भूमिका घेतली. त्यांनी माझ्यावर मावळ लोकसभा संघटकपदाची जबाबदारी सोपवली. तेव्हापासून सर्व मतदारसंघात सर्व शिवसैनिकांपर्यंत पोहोचविण्याचे काम आपण करत आहोत. आपल्या सर्वांना मिळून ही लढाईन जिंकायची आहे, असे संजोग वाघेरे पाटील यांनी संवाद साधताना सांगितले. यासह मतदार संघातील प्रश्न मार्गी लावण्यासाठी आणि तुमच्यासाठी लढण्यासाठी आपण सदैव तत्पर राहू, हा विश्वास वाघेरे पाटील यांनी व्यक्त केला.