ताज्या घडामोडीपिंपरी

भाजयुमो आयोजित “नमो चषक २०२४” पारितोषिक वितरण

Spread the love

पिंपरी , (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज)  – देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या संकल्पनेतून भारतीय जनता पक्षाच्या वतीने राज्यभरात ‘नमो चषक २०२४’ या क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. भारतीय जनता युवा मोर्चा पिंपरी चिंचवड शहराच्या वतीने भाजपा शहराध्यक्ष शंकरभाऊ जगताप यांच्या अध्यक्षतेखाली तसेच चिंचवड विधानसभा आमदार अश्विनीताई जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली चिंचवड विधानसभा कार्यक्षेत्रातील तानाजीनगर येथे ‘श्री शिवाजी उदय मंडल’ व भाजयुमो सरचिटणीस शिवम डांगे यांच्या संयोजनाने “नमो चषक २०२४” स्पर्धा मोठया उत्साहात पार पडली.

या स्पर्धेतंर्गत प्रामुख्याने स्केटिंग, जिम्नॅस्टिक्स, मल्लखांब, ऍथलेटिक्स, रनिंग, रस्सीखेच, रांगोळी, चित्रकला, ब्रॉड जम्प, ज्येष्ठ नागरिक व महिलांसाठी संगीत खुचीं आणि थ्रो-बॉल  स्पर्धा घेण्यात आल्या. आमदार अश्विनी जगताप यांनी स्पर्धेस उपस्थित राहून खेळाडूंचा उत्साह वाढवून त्यांना प्रोत्साहित केले. या खेळात अनेक चिमुकल्यांसह तरुण खेळाडूंनीही उत्कृष्ट खेळ खेळत उपस्थितांची मने जिंकली. प्रत्येक सहभागी खेळाडूला प्रशस्तीपत्र व विजेत्यांना मेडल्स आणि ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले.

या प्रसंगी, भाजयुमो महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस अनुप मोरे, भाजयुमो पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष तुषार हिंगे, भाजयुमो प्रदेश सचिव अजित कुलथे, भाजपा ज्येष्ठ नेते महेश कुलकर्णी, माजी नगरसेवक राजेंद्र गावडे, मोरेश्वर शेडगे, सुरेश भोईर, श्री शिवाजी उदय मंडळ अध्यक्ष गोडसे सर, भाजपा शहर उपाध्यक्ष रवींद्र देशपांडे, शेखर चिंचवडे, सचिव मधुकर बच्चे, रावेत काळेवाडी मंडल अध्यक्ष सोमनाथ भोंडवे, प्रभाग स्विकृत सदस्य विठ्ठल भोईर, भाजयुमो चिंचवड विधानसभा संयोजक योगेश चिंचवडे, प्रशांत आगज्ञान, सांस्कृतिक आघाडी धनंजय शाळिग्राम, भाजयुमो सरचिटणीस दीपक नागरगोजे, सतीश नागरगोजे, सचिन बंदी, कार्ती क्रिश्नन, भाजयुमो विद्यार्थी विभाग संयोजक कपिल अगज्ञान, रवींद्र प्रभुणे, प्रदीप सायकर, चंद्रशेखर जोगदंड, मयूर काळभोर, बाळासाहेब टोनपेकर, अनिकेत दळवी यांच्या भाजयुमो पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button